गर्भवती पोलीस अधिकाऱ्यांना साडी नेसून ड्युटी करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गर्भवती पोलीस अधिकाऱ्यांना साडी नेसून ड्युटी करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

गर्भवती पोलीस अधिकाऱ्यांना साडी नेसून ड्युटी करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Updated Oct 10, 2024 11:37 AM IST

pregnant lady Police can wear sari : राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. गर्भवती असतांना महिला पोलिस कर्मचाऱ्यांना साडी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गर्भवती पोलीस अधिकाऱ्यांना साडी नेसून ड्युटी करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
गर्भवती पोलीस अधिकाऱ्यांना साडी नेसून ड्युटी करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

pregnant lady Police can wear sari : राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गरोदर काळात महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना साडी नेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या बाबतचा आदेश सरकारने बुधवारी काढला आहे. दरम्यान, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यानंतर डीजीपी कार्यालया तर्फे संबंधित महिला कर्मचाऱ्याला साडी नेसण्याची परवानगी दिली जाणार आहे.

राज्य सरकारने महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर साडी नेसण्याची परवानगी दिली आहे. या साठी गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र संबंधितांना सादर करणे आवश्यक आहे. गर्भधारणेचे पाहिले काही महीने काळजी घेणे गरजेचे असते. या काळात महिलांनी पोटावर बेल्ट घातल्यास याचे गंभीर परिणाम संबंधित महिलेच्या तब्बेतीवर किंवा गर्भधरनेवर होऊ शकतात. तसेच गणवेश घळण्यातही अडचणी येतात. महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ही अडचण पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गर्भधारनेच्या काळात यापूर्वी गणवेश परिधान करण्यास सूट देण्याचा प्रस्ताव डीजीपी कार्यालयाने पाठविला होता. जो गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित होता. या बाबत बुधवारी सरकारने गर्भधारणा काळात गणवेश परिधान करण्याबाबत शिथिलता देणारा शासन निर्णय (GR) जारी केला.

निर्णय दिलासा देणारा

हा निर्णय गर्भवती आणि प्रसूतीनंतर महिला पोलिस अधिकाऱ्यांना दिलासा देणारा आहे. कारण गर्भवती असतांना अनेक महिलांना गणवेश आणि त्यावर बेल्ट घालणे अवघड जात होते. तसेच या काळात पोटातील बाळाला देखील त्रास होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे आता गर्भवती महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर