मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitesh Rane : कोणीही मस्ती करू नये, राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार, नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane : कोणीही मस्ती करू नये, राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार, नितेश राणेंचा इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 08, 2022 10:59 PM IST

अहमदनगर जिल्ह्यात आता अल्पसंख्याक पालकमंत्री नाहीत आणि राज्यातही हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे कोणीही मस्ती करु नये. कोणी मस्ती केली तर सर्व प्रकारचे औषध या सरकारकडे आहे,असाइशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

नितेश राणे
नितेश राणे

अहमदनगर - कर्जत येथे नुपूर शर्मा यांच्या विधानाचे समर्थन केल्यानेसनी उर्फ प्रतीक पवार या तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता.जखमी पवार याच्यावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूर केली तसेच पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणे (Nitesh rane) म्हणाले की, पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा योग्य पद्धतीने तपास झाला पाहिजे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास करावा. अहमदनगर जिल्ह्यात आता अल्पसंख्याक पालकमंत्री नाहीत आणि राज्यातही हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे कोणीही मस्ती करु नये. कोणी मस्ती केली तर सर्व प्रकारचे औषध या सरकारकडे आहे,असाइशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

प्रतीक पवार या युवकावर चार ऑगस्टला जीवघेणा हल्ला झाला होता. त्याने भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून हा हल्ला झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे.
 

नितेश राणे म्हणाले की, नूपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणूनच हा हल्ला झाला आहे. पोलिसांना दबावाला बळी न पडता तपास केला पाहिजे. स्थानिक पोलीस वेगळा बनाव करत आहेत. ज्याच्यावर हल्ला झाला, त्यालाच गुन्हेगारी वृत्तीचा ठरविण्याचे काम सुरू असल्याचे दिसते. यामध्ये सबळ पुरावे आहेत. जखमी युवक आणि आरोपी यांच्यातील संभाषणाचे पुरावे आहेत, तरीही हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे दर्शविले जात असून ते चुकीचे आहे, असे राणे म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या