Pune sharad mohol murder case criminal escapes from sasoon : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला.
मार्शल लुईस लीलाकर असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. लीलाकरने सोशल मिडियावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे पोलिसांनी लीलाकारला अटक केली. लीलाकर याला येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले होते.
येरवडा जेलमधून प्रकृती खराब असल्याच्या कारण त्याने सांगितले होते. यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला ससून हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. याची वेळी पोलिसांचे लक्ष नसतांना मार्शल लुईस लीलाकर हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी ८ पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे.
शरद मोहोळ याचा खून झाल्यावर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी मारेकऱ्यांना अटक केली आहे. दरम्यान, मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे देखील सांगितले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर मार्शल लुईस लीलाकर याला अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या