आम्हाला नको एकही उमेदवार! तब्बल ४२ हजार ९४६ पुणेकरांनी बजावला नोटाचा अधिकार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आम्हाला नको एकही उमेदवार! तब्बल ४२ हजार ९४६ पुणेकरांनी बजावला नोटाचा अधिकार

आम्हाला नको एकही उमेदवार! तब्बल ४२ हजार ९४६ पुणेकरांनी बजावला नोटाचा अधिकार

Nov 25, 2024 02:23 PM IST

Maharashtra Election news : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघात महायुतीने बाजी मारली आहे. मात्र, अनेक मतदारांनी नोटा अधिकाराचा वापर करत उमेदवारांना नापसंती दर्शवली.

आम्हाला नको एकही उमेदवार! तब्बल ४२ हजार ९४६ पुणेकरांनी बजावला नोटाचा अधिकार
आम्हाला नको एकही उमेदवार! तब्बल ४२ हजार ९४६ पुणेकरांनी बजावला नोटाचा अधिकार

Maharashtra Election news : पुण्यात २१ मतदार संघात चुरशीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांत महायुतीने १९ जागांवर यश मिळवले आहे. या वर्षी पुण्यात ६१.३६ टक्के मतदान झाले. यातील ४२ हजार ९४६ नागरिकांनी नोटाचा अधिकार बजावत 'आम्हाला कोणताही उमेदवार नको' म्हटलं आहे. जिल्ह्यातील चिंचवड आणि वडगाव शेरीतील उमेदवारांनी सर्वाधिक नोटाला पसंती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात नोटाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक ४ हजार ३१६ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. तर वडगाव शेरी मतदारसंघात ४ हजार २५९ मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत न देता ‘नोटा’ हा पर्याय निवडणला. पिंपरी मतदारसंघातही देखील ४ हजार १३ नागरिकांनी नोटाचा हक्क बजावला.

कोणताही उमेदवार पसंत नसल्यास ईव्हीएममशीन मध्ये नोटा हा पर्याय दिला जातो. २०१४ पासून हा पर्याय नागरिकांना दिला जातो. नागरिकांना मिळालेल्या या पर्यायाचा मोठा वापर झाला. २०१४ च्या निवडणुकीत नागरिकांनी सातव्या तसेच आठव्या क्रमांकाची मते नोटाला दिली होती. या निवडणुकीत देखील मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत नोटाला ३ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची; तर ७ मतदारसंघात चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

२०१४ च्या निवडणुकीत पिंपरी मतदारसंघात विजयी उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते नोटाला मिळाली होती. यानंतर २०१९ मध्ये देखील दौंड मतदारसंघात राहुल कुल यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते नोटाला होती.

यंदाच्या निवडणुकीत नोटाला मिळालेली मतदारसंघ निहाय आकडेवारी

जुन्नर : १३७६

आंबेगाव : ११५७

खेड-आळंदी : १६९२

शिरूर : २१८७

दौंड : १२११

इंदापूर : ६३४

बारामती : ७७९

पुरंदर : १४८४

भोर : २७२०

मावळ : २७१५

चिंचवड : ४३१६

पिंपरी : ४०१३

भोसरी : २६८५

वडगाव शेरी : ४२५९

शिवाजीनगर : २०४४

कोथरूड : ३१५२

खडकवासला : २९००

पर्वती : २४६१

हडपसर : २९४६

पुणे कॅन्टोन्मेंट : १८१५

कसबा पेठ : १२१३

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर