'तुम मराठी लोग गंदे, तुम्हारी औकात नही....' म्हणत उत्तर भारतीयाने गुंडांना बोलवत मराठी कुटुंबाला केली मारहाण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'तुम मराठी लोग गंदे, तुम्हारी औकात नही....' म्हणत उत्तर भारतीयाने गुंडांना बोलवत मराठी कुटुंबाला केली मारहाण

'तुम मराठी लोग गंदे, तुम्हारी औकात नही....' म्हणत उत्तर भारतीयाने गुंडांना बोलवत मराठी कुटुंबाला केली मारहाण

Dec 20, 2024 07:30 AM IST

Kalyan Crime : मुंबईत पुन्हा मराठी माणसाला हिणवून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका उत्तर भारतीय व्यक्तिने हे कृत्य केलं आहे. यात मराठी कुटुंबीय जखमी झाले आहे.

'तुम मराठी लोग गंदे, तुम्हारी औकात नाही....' म्हणत उत्तर भारतीयाने गुंडांना बोलवत मराठी कुटुंबाला केली मारहाण
'तुम मराठी लोग गंदे, तुम्हारी औकात नाही....' म्हणत उत्तर भारतीयाने गुंडांना बोलवत मराठी कुटुंबाला केली मारहाण

Kalyan Crime : मुंबईत पुन्हा एकदा मराठी व अमराठी वाद उफाळला आहे. उत्तर भारतीय असलेल्या एकाने कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंबाला शिवीगाळ करत गुंड बोलावून बेदम मारहाण केली. या कुटुंबाला लोखंडी रॉड, पाईप, काठया आदिने गंभीर मारहाण करण्यात आली आहे. यात दोघे जखमी झाले आहे. आरोपी उत्तर भारतीय व्यक्तिने 'तुम मराठी लोग गंदे, तुम्हारी औकात नही' असे म्हणत शिवीगाळ देखील केली आहे.

काय आहे प्रकरण ?

अखिलेश शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. मारहाणीच्या घटनेत दोघे तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कल्याण पश्चिमेत आजमेरा हाईटस् / १, योगीधाम बिल्डिंग मध्ये बुधवारी रात्री ७.४५ च्या सुमारास घडली. सोसायटीत राहणाऱ्या लता बाळकृष्ण कळवीकट्टे (वय ५६) व आरोपी अखिलेश शुक्ला व त्यांची पत्नी गिता शुक्ला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. घरात धुप अगरबत्ती लावल्याने व धुर झाल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला होता. अखिलेश शुक्ला हा मराठी असलेल्या लता कळवीकट्टे यांना घाण शब्दात व मराठी असल्यावरून हिणवत होता. “तुम मराठी गंदे लोग, तुम मच्छी मटण खाते हो. झोपडपट्टी में रहो. तुम मराठी निच हो, तुम्हारी औकात नहीं है सोयायती में रहने की,” असे म्हणत त्याने मराठी माणसाचा अपमान केला. मारहाणीच्या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असूनत्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाद सोडवायला गेलेल्या मराठी माणसांना धमकी देत गुंडांकडून केली मारहाण

सोसायटीत शूक्ला आणि कळवीकट्टे यांच्यात सुरू असलेला वाद पाहून सोसायटीतील काही नागरिक जमले. त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. सोसायतीतळ धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याच्या प्रयत्न केला. त्यांनी भांडण आपापसात मिटवुन घेण्याचा सल्ला दिला, पण सर्व मराठी लोकांना का अपमान करता? असा सवाल धीरज देशमुख यांनी शुक्लाला विचारला. यावर शूक्ला म्हणाला ‘मी मंत्रालयात कामाला आहे, तू मला मराठीचं सांगू नकोस. तुझ्यासारखे ५६ मराठी लोक माझ्यासमोर झाडू मारतात. एवढेच नाही तर त्याने 'एक मिनिट मे चीफ मिनिस्टर ऑफिससे फोन करूंगा, तो तुम्हारा पुरा मराठीपन निकल जायेगा. आधा घंटा रुर तेरा मर्डर कर देता हूं’, अशी धमकी देखील दिली. या प्रकारामुळे सोसायटीत चांगलाच राडा झाला.

दरम्यान, यावेळी धिरज देशमुख यांचा भाऊ अभिजीत तेथे आला असता, शुक्ला व त्याच्या पत्नी गिता शुक्ला हिने अभिजीतला टकल्या म्हणून हिणवले. यावेळी धिरज देशमुख यांनी आमच्या आईचं निधन झाल्याने आम्ही केस काढले असून तु टकल्या बोलून आमचा आपमान करू नको. यावर अखिलेश याने पुन्हा मुजोरी करत हिंदीत ‘तुमको मालुम नही. मै. कोन हु सारी पोलीस मुझसे डरती है. अभी तुम्हारा मराठीपन निकालता हु. मुझे सिर्फ अधा घंटा दो, अशी धमकी देत तेथून निघून गेला.

सोसायटीत गुंड आणून देशमुख व कळवीकट्टे कुटुंबीयांना मारहाण

थोड्या वेळानंतर सर्व शांत झालीवर देशमुख व कळवीकट्टे कुटुंबीय घरी निघून गेले. थोड्या वेळाने अमितेश शूक्ला हा १० ते १२ गुंडांना घेऊन सोसायटीत आला. देशमुख यांच्या घरी गुंडाना घेऊन जात त्यांनी त्यांच्या घराची बेल वाजवली. धीरज यांचे भाऊ अभिजीत यांनी घराचा दरवाजा उघडताच शुक्ला यांच्यासह गुंडांनी देशमुख यांच्या घरच्यांना बाहेर काढत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींने अभिजित यांच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. तर धीरज यांची पत्नी मोनाली यांना देखील अखिलेश व त्याच्या सोबत आलेल्या गुंडांनी मारहाण केली. मोनाली यांचा रेप करेन अशी धमकी देखील शुक्ला याने दिली. अखिलेशचीची पत्नी गिता शुक्ला यांनी देखील देशमुख यांची पत्नी मोनाली यांचे केस पकडुन त्यांना मारहाण केली. तर शुक्ला याने सबको मारडालो असे सोबत आणलेल्या गुंडांना सांगितले. आरोपींनी लता कळवीकट्टे यांना देखील मारहाण केली. त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे सोसायटीतील नागरिक जमले. यामुळे आरोपी शूक्ला व इतर गुंड फरार झाले.

पोलिसांत गुन्हा दाखल

ही घटना घडल्यानंतर देशमुख बंधू व कळवीकट्टे आणि इतर जण जवळीत खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. जखमी देशमुख यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी नेट असतांना देखील गुंडांनी त्यांचा पाठलाग करत पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दुपारी अखिलेश शुक्ला, गीता शुक्ला व इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर