मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद

Pune Water supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद

Jul 03, 2024 06:17 AM IST

Pune Water Supply : पुण्यात देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा विभागातर्फे पाइप लाइन दुरुस्तीची कामे हाती घेण्यात अली आहे. यामुळे गुरुवारी पुण्यात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद

Pune Water Supply : खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर व भामा आसखेड जॅक्वेल येथे विद्युत पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. ४)पुण्यातील विविध भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती एमएलआर टाकी परिसर : गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

ट्रेंडिंग न्यूज

पर्वती आयआयएलआर टाकी परिसर सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्र्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, प‌द्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.

पर्वती एलएलआर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग

हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर,सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसुर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी न्नाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, सविता सोसा, विठ्ठल मंदिर रस्त्यापर्यंत, म्हाडा कॉलनी, नेहरूनगर वसाहत, पाळंदे कुरियर, राहुलनगर, प्रीतमनगर इत्यादी.

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी

WhatsApp channel
विभाग