Nashik Water Supply: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, सातपूर विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद!-no water supply in nashik west division and satpur division on 23 feb 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Water Supply: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, सातपूर विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद!

Nashik Water Supply: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, सातपूर विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद!

Feb 22, 2024 08:46 PM IST

Nashik Water Cut: नाशिकमध्ये दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली असून शुक्रवारी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे नाशिकमध्ये काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद असेल.

Nashik water Supply
Nashik water Supply

No Water Supply in Nashik: नाशिकच्या सातपूर विभागातील प्रभाग ९ मधील कार्बन नाका येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जलकुंभाला दोन ठिकाणी गळती सुरू झाल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. यामुळे सातपूर विभागातील पाच प्रभागात उद्या (शुक्रवारी, २३ फेब्रुवारी २०२४) सकाळी ०९.०० वाजल्यापासून पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सातपुर विभागातील कार्बन नाका भागात आणि शिवाजीनगर येथील महापालिकेच्या शाळेजवळील अशा दोन ठिकाणातील जलवाहिनीला गळती सुरु झाली. वाहिनीच्या दुरुस्तीचे काम उद्या शुक्रवारी करण्यात येणार आहे. यामुळे सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८,१०, ११ आणि नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ आणि १२ येथे उद्या सकाळी ०९.०० वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. यामुळे नागरिकांनी पाणी जपूर वापरावे, असे आवाहन नाशिक मनपा पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

कोणकोणत्या भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार?

 

सातपूर विभाग-

प्रभाग क्रमांक ८: बळवंत नगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर, रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परिसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकरनगर, पाईपलाईन रोड, काळेनगर, सदगुरुनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंदनगर, निर्मल कॉलनी, शंकरनगर, चित्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर.

प्रभाग क्रमांक १०: अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तुनगर, विवेकानंद नगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजीनगर, राधाकृष्णनगर.

प्रभाग क्रमांक ११: प्रबुद्ध नगरसह इतर परिसर.

 

नाशिक पश्चिम विभाग-

प्रभाग क्रमांक ७: नहुष जलकुंभ परिसर, नरसिंहनगर, पूर्णवादनगर, अरिहंत रुग्णालय परिसर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा, आनंदनगर, डी. के. नगर, शांतीनिकेतन सोसायटी परिसर, आयचित नगर, चैतन्यनगर, सहदेवनगर, पंपिंग स्टेशन, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर, सावरकरनगर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लीकर रुग्णालय परिसर, जेहान चौक.

प्रभाग क्रमांक १२: रामराज्य जलकुंभ परिसर, यशवंत कॉलनी, कल्पनानगर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड, शिवगिरी सोसायटी, एस. टी. कॉलनी आणि शहीद चौक परिसर.

विभाग