Ashadhi wari sohala : आषाढी वारी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला आळंदीतून पंढरपूरसाठि प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून आळंदी येथील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता आळंदीत इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वर्षी देखील दरवर्षी प्रमाणे या सोहळ्यात लाखोंच्या संखेने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. आळंदीत दाखल होणाऱ्या वाहनांना आज पासून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ही वाहतूक बंदी आज पासून रविवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार आहे.
आळंदी येथील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. चाकण ते चिंबळी फाटा चौकमार्गे आळंदीकडे येणारी वाहने व आळंदी फाटा चाकण येथून आळंदीकडे येणारी वाहने जय गणेश साम्राज्य चौक व अलंकापुरम चौक मार्गे भोसरी चौकातून मॅगझीन चौक मार्गे वळविण्यात आली आहेत.
तर चाकण-शेलपिंपळगाव- वडगाव घेनंदमार्गे आळंदीकडे येणारी वाहने कोयाळी फाटा कोयाळी गावातून मरकळगाव मार्गे वळविण्यात आली आहे. मरकळकडून धानोरे फाटा मार्गे आळंदीकडे येणारी वाहने धानोरे फाटा- च-होली फाटा-मॅगझीन चौक- अलंकापुरम चौक मार्गे पुढे जातील.
भारतमाता चौक-मोशी चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. येथील वाहतूक ही जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौकातून मॅगझीन चौक मोशीमार्गे चाकण- शिक्रापूर मार्गे वळविण्यात आली आहे.
तर पुणे-दिघी मॅगझीन चौकाकडून आळंदीकडे येणारी वाहने ही भोसरी-मोशी- चाकण, च-होली फाटा-कोयाळी, शेलपिंपळगाव व अलंकापुरम-जय गणेश साम्राज्य चौक मार्गे वळवली आहे.
पुण्याकडून येणारी वाहतूक ही व आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना चरोली फाटा चौक येथून पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर मोशीकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना डुडुळगाव जकात नाक्याचे पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
चिंबळीकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना केळगाव चौक-बापदेव चौकाचे पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर चाकण बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना इंद्रायणी हॉस्पिटलचे पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वडगाव-घेनंद येथून आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांना विश्रांतवाडी पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर मरकळकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना धानोरी फाटा-पीसीएस चौकाचे पुढे जाण्यास बंदी आहे.
संबंधित बातम्या