‘पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवा; मला शिव्या खाव्या लागतात’; नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर-nitin gadkari says pune mumbai and pune nagar roads will be taken over if potholes are not filled ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवा; मला शिव्या खाव्या लागतात’; नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर

‘पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवा; मला शिव्या खाव्या लागतात’; नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर

Sep 22, 2024 01:48 PM IST

Nitin Gadkari on Pune Mumbai express way : नितीन गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे मुंबई पुणे आणि पुणे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून हे खड्डे पुढील तीन महिन्यात बुजवा असे नितीन गडकरी यांनी सरकारला म्हंटलं आहे.

‘पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवा; मला शिव्या खाव्या लागतात’; नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर
‘पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवा; मला शिव्या खाव्या लागतात’; नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर

Nitin Gadkari on Pune Mumbai express way : पुणे मुंबई आणि पुणे नगर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. यावरून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. पुढील तीन महिन्यात या दोन्ही रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास केंद्र सरकार हे दोन्ही रस्ते आपल्या ताब्यात घेईल असे गडकरी यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण आणि वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते व पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आयोजित कार्यक्रमात सरकारचे कान टोचले.

काय म्हणाले नितीन गडकरी ?

नितीन गडकरी म्हणाले, पुणे-मुंबई व पुणे-नगर या दोन रस्त्यांची जबादारी ही राज्य सरकारची आहे. मात्र, या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा मागणी करून देखील या मार्गावरील खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळं मला शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे पुढील तीन महिन्यात हे रस्ते दुरुस्त करावे.

पुण्यात येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कामांना सुरुवात केली जाणार आहे. तब्बल दीड लाख कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे. पालखी मार्गाची निर्मिती करताना वृक्षतोड टाळून ८०० झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले असून हा मार्ग ‘ग्रीन हायवे’ करण्यासाठी शासनाने स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी व वृक्षारोपणाचे करावे, असे देखील गडकरी म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणा दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांची घोषणा बाजी

खासदार सुप्रिया सुळे या देखील या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होत्या. यावेळी त्या भाषण करण्यासाठी आल्या असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ व ‘भाजप झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील खासदार सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या घोषणा दिल्या. या वेळी सुळे

Whats_app_banner