Nitin Gadkari : जे काँग्रेसनं केलं तेच आपण करत राहिलो तर सत्तेत येण्याला काय अर्थ?; नितीन गडकरी यांचा स्वपक्षाला टोला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari : जे काँग्रेसनं केलं तेच आपण करत राहिलो तर सत्तेत येण्याला काय अर्थ?; नितीन गडकरी यांचा स्वपक्षाला टोला

Nitin Gadkari : जे काँग्रेसनं केलं तेच आपण करत राहिलो तर सत्तेत येण्याला काय अर्थ?; नितीन गडकरी यांचा स्वपक्षाला टोला

Jul 13, 2024 09:37 AM IST

Nitin Gadkari news : नितीन गडकरी यांनी जातीपातीच्या राजकारणावर टीका केली. ‘जो कुणी जातीबद्दल बोलेल त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असे ते म्हणाले. पणजीजवळ भाजपच्या गोवा कार्यकारिणीच्या बैठकीत गडकरी बोलत होते.

 ''जे काँग्रेसनं केलं जर तेच करत राहिलो तर सत्तेत येण्याच्या काय अर्थ ?'' नितीन गडकरींचा पुन्हा घरचा आहेर
''जे काँग्रेसनं केलं जर तेच करत राहिलो तर सत्तेत येण्याच्या काय अर्थ ?'' नितीन गडकरींचा पुन्हा घरचा आहेर (MINT_PRINT)

Nitin Gadkari news : भारतीय जनता पक्ष (भाजप) हा वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले. काँग्रेसने भूतकाळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा इशाराही त्यांनी पक्षाला दिला. ज्यामुळे जनतेने काँग्रेसला सत्तेतून बाहेर ठेवलं, ते कारण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. "काँग्रेसने जे केलं जर आपणही तेच करत राहिलो तर सत्तेत येऊन काहीच अर्थ नाही, असा घरचा आहेर नितीन गडकरी यांनी दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर जवळपास एक महिना उलटून गेल्यावर गडकरी यांनी पक्षीय धोरणावर पुन्हा एकदा टीका केली आहे. पणजीजवळ भाजपच्या गोवा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना गडकरी यांनी वरील वक्तव्य केले. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अन्य नेते उपस्थित होते. त्यांच्या ४० मिनिटांच्या भाषणात गडकरी यांनी त्यांचे गुरू आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजप हा वेगळ्या विचारसरणीचा पक्ष होता, यावर टीका केली. गडकरी म्हणाले, "जो कोणी जातीबद्दल बोलेल त्याची थेट पक्षातून हकालपट्टी केली जाईल. आम्ही वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहोत, असे अडवाणीजी म्हणायचे. इतर पक्षांपेक्षा आपण किती वेगळे आहोत हे समजून घेतले पाहिजे. काँग्रेसच्या चुकांमुळेच लोकांनी भाजपला निवडले, त्यामुळे त्याच चुका पुन्हा करू नयेत, असे देखील गडकरी म्हणाले.

गडकरी म्हणाले, आपण देखील जर त्याच चुका करत राहिलो तर त्यांच्या जाण्याचा आणि आपला सत्तेत येण्यात काही अर्थ नाही, आगामी काळात राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचे माध्यम आहे, हे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाणून घेतले पाहिजे. आम्हाला भ्रष्टाचारमुक्त देश बनवायचा आहे आणि त्यासाठी योजना आखली पाहिजे, असे देखील गडकरी म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, आपल्या राज्यात जातीच्या आधारावर राजकारण करण्याचा ट्रेंड आहे. मी हा ट्रेंड न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मी लोकांना सांगितले आहे की मी जातीच्या राजकारणात उतरणार नाही. जो कोणी जातीबद्दल बोलेल त्याला कठोर शिक्षा होईल. व्यक्तीची ओळख ही त्याच्या जातीवरून नव्हे तर त्याच्या संस्कारांवरून होते, असे देखील गडकरी म्हणाले, भाजपच्या गोव्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना गडकरींनी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना प्रत्येक मतदारसंघात भेट देऊन संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. जेणेकरुन २०२७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची सत्ता पुन्हा टिकवता येईल.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर