Nitin Gadkari: नितीन गडकरींनी सिंधुताई सपकाळांच्या हृदयस्पर्शी आठवणींना दिला उजाळा, म्हणाले...-nitin gadkari on sindhutai sapkal ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari: नितीन गडकरींनी सिंधुताई सपकाळांच्या हृदयस्पर्शी आठवणींना दिला उजाळा, म्हणाले...

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी सिंधुताई सपकाळांच्या हृदयस्पर्शी आठवणींना दिला उजाळा, म्हणाले...

Jun 29, 2023 08:42 PM IST

Nitin Gadkari On Sindhutai Sapkal: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माईंच्या ममता बाल सदनला भेट देऊन सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच अनाथ मुलांना लाखोंची मदत करण्याचे आश्वासन दिले.

Nitin Gadkari
Nitin Gadkari

देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ममता बाल सदन या अनाथ मुलींच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी नितीन गडकरी यांनी अनाथ मुलींसमोर आपला जीवन प्रवास उलगडला. तसेच नितीन गडकरी यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या संस्थेला अकरा लाख रुपयांची मदत जाहीर केली.

"माईंची भेट माझी सोलापुरात एका कार्यक्रमात झाली. सोलापुरात माईंच्या भाषणाने लोकांचे अश्रू अनावर झाले, तेव्हा शाल फिरवून ‘तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत करा, पैसे झोळीत टाका, माईंच्या कार्याला मदत करा, असे मी लोकांना सांगितले तेव्हा माईंना बरीच मदत झाली. माई माझ्याकडे नेहमी येत, शक्य होईल तेव्हा मी त्यांना मदत करायचो" असं नितीन गडकरी म्हणाले.

माईंच्या आठवणींना उजाळा देतांना गडकरी म्हणाले की, " माईंचा आणि माझा जवळचा संबंध होता. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपला जीवन प्रवास केला. अनेक यातना सहन केल्या. त्यांचा अनेक प्रकारे उपहास झाला, अपमान झाला पण त्या डगमगल्या नाहीत. त्या सतत काम करीत राहिल्या. समाजातल्या ज्याला कोणीच नाही त्याला माईंनी आधार दिला. अश्या मुला-मुलींचे पालकत्व स्वीकारले. मी अगदी जवळून त्यांचं कार्य बघितलं आहे. ममता बाल सदनला भेट दिल्यावर माईंच्या कार्याची अधिक जाणीव होते. त्यांचे कार्य ईश्वरीय कार्य होते ते थांबता कामा नये."

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या जे मनात असते ते बोलून रिकामे होतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले असते. त्याचा प्रत्यय आज मुलींना आला. चिमुकल्या मुलींनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी ते मुलांमध्ये रमल्याचे दिसून आले. भविष्यात या सर्व संस्था सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. शेवटी त्यांनी जाता-जाता अकरा लाख रुपयाची मदत देण्याचे आश्वासन दिले.

Whats_app_banner
विभाग