पुणे–केंद्रीयरस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील नवीन पुलाचे लोकार्पण केले. यावेळी नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहनांची गर्दी, ट्रॅफिक आणि प्रदुषणकमी करून पुण्याला जुने दिवस आणण्याचे आवाहन केले. गडकरी म्हणाले की, पुण्यातील रस्ते विस्तारासाठी जागाच शिल्लक नाहीत. त्यामुळे भविष्यात हवेत चालणाऱ्या बसेस आणाव्या लागतील. माझ्याकडे त्याचं प्रेझेंटेशन आहे. अजितदादा आणि चंद्रकांत दादा तुम्ही दोघांनी हा प्रकल्प बघून घ्यावा, असं डकरी म्हणाले.
पुण्याला पेट्रोल, डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे. इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. मी स्वत: दिल्लीत हायड्रोजनवर चालणारी कार वापरतो.
नितीन गडकरी म्हणाले की, पुण्यात प्रदूषण खूप वाढले आहे. त्यामुळे पुणे अजून वाढवू नका, शहराला मोकळा श्वास घेऊ द्या, पुण्याला जुने दिवस आणा, असे आवाहन त्यांनी केली.
नितीन गडकरी म्हणाले, पुणे आता अधिक वाढवून आणखी प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा येत होती. परंतु आता ही हवा हरवली आहे. पुणे सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे.
मंत्र्यांच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनांचे सायरन काढणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केलीये. लवकरच कर्णकर्कश हॉर्न ऐवजी मधूर आणि सुरेल भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवण्यात येणार आहे.
चांदणी चौकातल्या पुलाचं उद्घाटन केलं असलं तरी त्याचं नाव अद्याप ठरलेलं नाही. यावर नितीन गडकरी म्हणाले की, चांदणी चौकातल्या पुलाचं नाव हे अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मिळून ठरवा. जे ठरवायचं ते ठरवा. तुम्ही एकमताने ठरवाल त्या नावाला एकमातने अनुमती देईन.