मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati-Chikhali Highway : गडकरींकडून ८१६ कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन, बुलढाणा महामार्ग गुजरातसह चार राज्यांना जोडणार

Amravati-Chikhali Highway : गडकरींकडून ८१६ कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन, बुलढाणा महामार्ग गुजरातसह चार राज्यांना जोडणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 11, 2023 10:25 PM IST

Amravati chikhali national highway :केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक५३च्या शेलाड ते नांदुरा या टप्प्याचे उद्घाटन केले.

गडकरींकडून ८१६ कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन
गडकरींकडून ८१६ कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या शेलाड ते नांदुरा या टप्प्याचे उद्घाटन केले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात ८१६ कोटी रुपये खर्चाचे रस्ते निर्माण करण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शेलाड-नांदुरा विभागाच्या चतुर्भूज प्रकल्पाची एकूण लांबी ४५ किमी असून यामध्ये १४ किमी ग्रीनफिल्ड बायपास, ४ मोठे पूल, १६ छोटे पूल, ६३ कल्व्हर्ट, १ रोड ओव्हर ब्रीज, ८ वाहन भुयारी मार्ग, २ पादचारी भुयारी मार्ग, १२ बस थांबे यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३ हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशा तसेच देशातील इतर राज्यांमधील महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. तसेच, हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जळगाव, खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. हा महामार्ग रायपूर-नागपूर-सुरत किंवा पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी चांगली संपर्क सुविधा असल्यानेही महत्त्वाचा ठरतो.

या प्रकल्पामुळे खामगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला असून अपघातांचे प्रमाणही कमी होण्यासही याची मदत होणार आहे. वाहन अंडरपास आणि रोड ओव्हर ब्रीज प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करतील. या प्रकल्पामुळे शेगाव,लोणार किंवा इतर धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मितीचा विकास होईल.

 

मलकापूर - बुलढाणा - चिखली या १,२००कोटी रुपये खर्चाच्या तर बाळापूर - शेगाव या २२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ३५० कोटी रुपये खर्चाची योजना जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय चिखली ते ठाकरखेड यासह इतर रस्त्यांच्या २५ कोटी रुपयांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

WhatsApp channel