मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO: लग्न झाल्यावर काहीच केलं नाही, तर तुम्हाला पोरं कशी होणार? – नितीन गडकरी

VIDEO: लग्न झाल्यावर काहीच केलं नाही, तर तुम्हाला पोरं कशी होणार? – नितीन गडकरी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 18, 2022 05:23 PM IST

आधुनिक शेतीवर बोलताना शेतकऱ्यांना वैज्ञानिक व तांत्रिक प्रयोगांची मदत घेण्याचं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं. लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही,तर पोरं कशी होणार?”असा सवालही केला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

नितीन गडकरी
नितीन गडकरी

अमरावती - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,आता आपल्याला शेती अशी करायची आहे की प्रथम क्रमांकावर शेती राहिली पाहिजे, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी आली पाहिजे. तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे उत्पादन वाढवून आणि खर्च कमी करून जागतिक बाजारपेठेत जाऊन उत्पन्न वाढवता येतं. ते सोमवारी (१८ जुलै) अमरावतीत बोलत होते.

यांनी आधुनिक शेतीवर बोलताना शेतकऱ्यांना वैज्ञानिक व तांत्रिक प्रयोगांची मदत घेण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं. तसेच चांगलं उत्पादन काढलं, चांगलं पॅकिंग केलं,तर उत्पन्न वाढेल,असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही,तर पोरं कशी होणार?” असा सवालही केला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

द्राक्षे लंडनच्या बाजारात तर संत्री का जात नाहीत -

विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत,तर आपली संत्री का जात नाही? आपण कशामुळे मागे का आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात,असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही,तर पोरं कशी होणार?

नितीन गडकरी पुढे म्हणाले,तुम्ही जर चांगलं उत्पादन काढलं,चांगलं पॅकिंग केलं,तर उत्पन्न वाढेल. तुम्हालाच हे करायचं आहे. एकतर परमेश्वर किंवा सरकार असं व्हायला नको. देवाने दिलं,देवाने नेलं असं जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरूर पाहिजे,पण देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार?”

तुम्हाला देखील काही पुढाकार घ्यावा लागतो. हे उदाहरण लोकांना जास्त चांगलं समजतं. त्यामुळे तुम्हीच तुमच्या या प्रयत्नातून हे प्रयोग यशस्वी करा. माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नका. तुम्ही प्रयत्न केला,तर यात तुम्हाला नक्की यश मिळेल,” असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point