Nitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल, पत्नीच्या तक्रारीनंतर कारवाई
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल, पत्नीच्या तक्रारीनंतर कारवाई

Nitin Desai Death : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल, पत्नीच्या तक्रारीनंतर कारवाई

Published Aug 04, 2023 07:26 PM IST

Nitindesaisuicidecase : नितीन देसाई यांच्यापत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रारदाखल केली होती. यातक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nitin Desai
Nitin Desai

बॉलीवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (२ऑगस्ट) गळफास घेऊनआपले जीवन संपवले. त्यांच्या पार्थिवावर आज कर्जतच्या एनडी स्टूडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात आता मोठी अपडेटसमोर आली असून याप्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रारदाखल केली होती. यातक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईसीएल फायनान्स कंपनी व एडलवाईस ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी या पाच जणांविरुद्धगुन्हा दाखल केला आहे. या पाच जणांविरोधात कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीनं मानसिक छळ केल्याचा आरोप झाला होता. कंपनीच्या व्याजाचा दर,व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष पथक नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती.

 

नितीन देसाई प्रकरणात आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच एडलवाइज कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. त्यात कंपनीने सगळ्या बाजूंची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी केली होती. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर