Kolhapur Nirbhaya Squad: पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यापूर्वी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. ज्यात दोन महिलेसह तीन आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेला काहीच दिवस उलटले तोच कोल्हापुरात निर्भया पथकाने टकाळा चौकातील टोकियो कॅसल कॅफेवर कारवाई केल्याची माहिती समोर आली. कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणी अश्लील कृत्य करत असल्याची माहिती निर्भया पथकाला मिळाली. छापेमारीदरम्यान नको त्या अवस्थेत आढळलेल्या ६ जोडप्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोल्हापुरातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी निर्भया पथकाने कारवाईला सुरुवात केली आहे. निर्भया पथकाने गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापुरातील अनेक पथकावर छापेमारी करत त्यांचे पितळ उघडे पाडले. यानंतरही कोल्हापूर शहरातील टोकियो कॅसल कॅफेत तरुण- तरुणांची अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती निर्भया पथकाला मिळाली. यानंतर आज दुपारी निर्भया पथकाने छापेमारी केली. यावेळी कॅफेच्या काळ्या काचांमागे सुरू असलेले अवैध धंदे उघडकीस आले.
छापेमारीत निर्भया पथकाला कॅफेत निरोधची पाकिटे आढळली. यानंतर निर्भया पथकाने कॅफे चालकाला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला उत्तरे देता आली नाही. महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी पोलिसांनी या कॅफेत ६ जोडपे नको त्या अवस्थेत आढळले. या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. निर्भया पथकाच्या कारवाईने कोल्हापुरातील कॅफे मालकांचे धाबे दणाणले आहेत.