जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार

जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार

Published Oct 14, 2024 08:37 PM IST

जालना शहरात एका नऊ वर्षांच्या मुलीला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार करून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मुलीची प्रकृती गंभीर आहे.

जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जालना शहरात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीला अंमली पदार्थ देऊन  तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर आरोपींनी तिला रस्त्यावर फेकून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला जालना जिल्हा रुग्णालयातून संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चंदनझिरा परिसरात ही घटना घडली. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून तिला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत  एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. प्राथमिक पुराव्यांनुसार पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलगी एकटी असताना तिला घरातून उचलून नेले आणि तिला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर अत्याचार करून तिला रस्त्यावर सोडून फेकून दिले.

पीडित मुलगी आईसोबत राहते. घटनेच्या वेळी तिची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती. महिला घरी परतली तेव्हा तिला मुलगी सापडली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध घेतल्यानंतर जवळच्या गल्लीत मुलगी जखमी अवस्थेत आढळली. त्यानंतर महिलेने चंदनझिरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पाच संशयितांना अटक केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर