Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्यानं अख्खं कुटुंब रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यान १२ वर्षीय मुलीचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्यानं अख्खं कुटुंब रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यान १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्यानं अख्खं कुटुंब रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यान १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

Oct 06, 2024 05:01 PM IST

Nanded Food poisoning News: नांदेडमध्ये सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकी आली असून उपचारदरम्यान १२ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.

सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा

Food Poision In Nanded: नांदेडमध्ये सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान एका १२ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेची स्थानिक पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा खानजोडे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सिडको येथील रहिवासी बबन खानजोडे यांनी तीन दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या. त्यानंतर गुरुवारी रात्री सर्वांनी सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्या. मात्र, काही वेळानंतर कुटुंबातील सर्वांनाच मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला. यानंतर गावकऱ्यांनी त्यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मीरा हिचा मृत्यू झाला. विषबाधा नेमकी कशामुळे झाली. सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्याने विषबाधा झाली की, यामागे इतर दुसरे कारण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत.

नांदेड: दूषित पाणी प्यायल्याने २०० जणांना विषबाधा

नांदेड जिल्ह्यातील रली कुष्ठधाम येथे दूषित पाणी प्यायल्याने दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. ही घटना गेल्या महिन्यात घडली. सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी प्यायल्याने नागरिकांना उलट्यासह चक्कर व डोकेदुखी होऊ लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी नांदेड जवळच असलेल्या नेरली कुष्ठधाम येथील काही नागरिकांना उलटी, जुलाब, डोके दुखणे, चक्कर येऊ लागल्याची माहिती समोर आली. मात्र, काही वेळाने आजारी नागरिकांची संख्या वाढू लागली. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर झाली. त्यानंतर आजारी नागरिकांना तातडीने रात्री १२ वाजता नांदेडमधील खासगी व शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णांमध्ये लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींचाही समावेश होता. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

लातूर: शासकीय वस्तीगृहातील ६० मुलींना विषबाधा

लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. या मुलींनी काल (५ ऑक्टोबर २०२४) रात्री भेंडीची भाजी आणि चपाती खाल्ली. मात्र, यानंतर त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही मुलींची प्रकृती गंभीर आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर