western railway cancelled train list : सध्या गुजरातमध्ये पावसाने कहर केला आहे. पावसामुळे आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे गुजरातमधील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट तर २२ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे रेल्वे सेवेवर देखील परिमाण झाला आहे. रेल्वे रुळावर पाणी साठल्याने मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
गुजरातमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे काही गाड्या या स्थानकावरच थांबवण्यात आल्या आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. या मुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना फटका बसला आहे. दादर व वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसलाही याचा फटका बसला आहे.
दादर व वांद्रे टर्मिनसवरून गुजरातसाठी विविध गाड्या सोडल्या जातात. या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत. मात्र, पावसामुळे आज गुरुवारी सोडण्यात येणाऱ्या ९ गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत.यात गुजरात सुपरफास्ट एक्सप्रेस (२२९५३), री दादर-रणकपुर एक्सप्रेस (१४७०८), वांद्रे- पे जयपूर विशेष एक्सप्रेस (०९७२४), वांद्रे- ग ती जयपूर एक्सप्रेस (१२९७९), वांद्रे-बीकानेर एक्सप्रेस (०४७१२), दादर-भुसावळ एक्सप्रेस (१९००३), वांद्रे-जोधपूर एक्सप्रेस (१२४८०), दादर-पोरबंदर (१९०१५) या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर वांद्रे-श्री गंगानगर, एक्स्प्रेस वांद्रे ते अजमेर एक्सप्रेस देखील रद्द करनेत आली आहे. काही गाड्या या अजमेरवरून गंगानगरसाठी रवाना होणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस कोकणवासीयांसाठी सुरू होणार असून आज २९ ऑगस्ट रोजी या रेल्वेगाडीची उद्घाटन फेरी बोरिवली ते मडगावदरम्यान धावेल. या गाडीला रेल्वेमंत्री अश्विनी नी. वैष्णव, उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आणि वसई-विरार या भागात राहणाऱ्या कोकणवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र रेल्वेगाडीची मागणी होती.