मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune NIA Raiad : पुण्यात एनआयची मोठी कारवाई! दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत सील

Pune NIA Raiad : पुण्यात एनआयची मोठी कारवाई! दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत सील

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 17, 2024 01:49 PM IST

Pune NIA Raiad : पुण्यात एनआयच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पुण्यात, मुंबईत आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोटाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांनी वापरलेली इमारतील सील करण्यात आली.

पुण्यात एनआयची मोठी कारवाई
पुण्यात एनआयची मोठी कारवाई

Pune NIA Raiad : पुण्यात आयसीसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. हे दहशतवादी पुण्यात, मुंबईत आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याचे स्पष्ट झाले असून या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यात एका इमारतीत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे देखील तपासात उघड झाले आहे. यामुळे एनआयच्या पथकाने मुंबई आणि पुण्यात काही ठिकाणी छापेमारी केली असून कोंढव्यात दहशतवादी कारवायासाठी वापरण्यात आलेली इमारत एनआयएच्या पथकाने सील केली आहे.

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना! वंचितला दिला शेवटचा पर्याय, नवा प्रस्ताव देणार नाही

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने काही दिवसांपूर्वी मोहम्मद रिजवान अली, अब्दुलाह शेख, शहानाझ आलम, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली होती.

DC vs RCB WPL 2024 Final : विराटची आरसीबी तिनदा फायनल हरली, आज एलिस पेरी इतिहास रचणार?

यातील मोहम्मद आलम या दहशतवाद्यालला कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरत असतांना अटक केली होती. या नंतर पुण्यातील आययसीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. मोहम्मद हा फरार झाला होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या विशह पथकाने त्याला गेल्या वर्षी २ नोव्हेंबर २०२३ ला अटक करत त्याला एनआयएच्या ताब्यात दिले होते. यानंतर याच्या कडून अनेक मोठी माहिती पुढे आली. आरोपीनी सातारा जिल्ह्यातील एका कपड्याच्या दुकानात दरोडा टाकून त्यातून आलेल्या पैशातून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केले.

यानंतर कोंढव्यात असलेल्या त्यांच्या घरात त्यांनी बाँम्ब कसा तयार करायचा याचे प्रशिक्षण घेतले. सातारा आणि कोल्हापूर परिसरातील जंगलात दहशतवाद्यांनी नियंत्रित पद्धतीने या बॉम्बची चाचणी देखील. आणि शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, एनआयएच्या पथकाने शनिवारी कारवाई करत येथील मीठानगर येथील इमारत जप्त केली.

IPL_Entry_Point