मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PFI: राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित ठिकाणांवर NIA, ED, ATS चे छापे; पुण्यातून दोघांना अटक

PFI: राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित ठिकाणांवर NIA, ED, ATS चे छापे; पुण्यातून दोघांना अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 22, 2022 04:35 PM IST

NIA, ATS And ED Raid :राज्यात इस्लामिक संघटना म्हणून नावारूपास आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर गुरुवारी सकाळी राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी छापे टाकले आहे. पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात एटीएसची कारवाई
पुण्यात एटीएसची कारवाई

पुणे : इस्लामिक संघटना म्हणून नावारूपास आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर गुरुवारी सकाळी राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलीस यांनी छापे टाकले आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई, भिवंडी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड आदीठिकाणी छापेमारी करण्यात आली असून पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यातून तब्बल २० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला आहे.

पुणे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष अझीझ बन्सल यांनी सांगितले की, एनआयए आणि यांनी पुण्यात विविध ठिकाणी छापेमारी केलेली आहे. या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कोंढवा भागातील कार्यकर्ते रजी खान आणि अब्दुल कय्याम शेख  यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप तपास यंत्रणांनी माझ्याकडे कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. यासंदर्भात नेमके शहरात कुठे, कुठे तपास यंत्रणांनी छापेमारी केली आहे आणि कोणाला ताब्यात घेतले आहे याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत.

कयूम शेख आणि रजी अहमद खान या दोघांना घेऊन NIA चे पथक हे नाशिकला रवाना झाले आहे. मालेगाव येथूनही काही जणांना अटक करण्यात आली आहे. या छापेमारीमुळे खळबळ उडाली आहे. या कारवाई संदर्भात एटीएसच्या पथकाने या संदर्भात प्रेसनोट जारी केली आहे. त्यानुसार नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईत ही छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवाद आणि समाजविघात कारवाया केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरतून २० जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

१० राज्यांच्या पोलिसांची मदत घेऊन एनआयए आणि ईडीनं ही कारवाई केली आहे. आतंकवाद्यांना फंडिंग करणे आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीरं आयोजित करण्याचा आरोपी पीएफआयवर आहे. त्यामुळं मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संघटनेच्या १०० लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. देशभरातील या छापासत्रानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केरळच्या मलप्पुरममध्ये जोरदार आंदोलन करत तपास यंत्रणांविरोधात घोषणाबाजी केली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग