NIA Raid : एनआयएची कर्नाटक, महाराष्ट्रात मोठी कारवाई! ४० ठिकाणी छापे टाकत ७ ते ८ जणांना अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NIA Raid : एनआयएची कर्नाटक, महाराष्ट्रात मोठी कारवाई! ४० ठिकाणी छापे टाकत ७ ते ८ जणांना अटक

NIA Raid : एनआयएची कर्नाटक, महाराष्ट्रात मोठी कारवाई! ४० ठिकाणी छापे टाकत ७ ते ८ जणांना अटक

Published Dec 09, 2023 09:04 AM IST

NIA Raid in Maharashtra Pune and Mumbai : महाराष्ट्रात तसेच कर्नाटकात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सकाळ पासून छापेमारी सुरू केली असून महाराष्ट्रातील इसिस मॉड्युलशी संबंधित तब्बल सात ते आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

Nia raid 
Nia raid 

NIA Raid in Maharashtra Pune and Mumbai : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) पथकाने सकाळपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रात छापेमारी सुरू केली आहे. तब्बल ४१ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सकाळपासून सुरू असलेल्या कारवाईत तब्बल ७ ते ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. या पूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने शामिल नाचनसह काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने भिवंडी येथील पडघा गावात आज सकाळी छापेमारी केली. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ जणांना अटक केली आहे. पुण्यात दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यावर रस्त्रीय तपास यंत्रणेने कारवाई तीव्र केली आहे. भिवंडी येथील पडघा गावातून दोन ते तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, आज देखील सकाळपासून एनआयचे धाडसत्र सुरू आहे. आज आणखी ७ ते ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

आज सकाळ पासून एनआयएने देशात ४१ ठिकाणी छापे टाकले आहे. सर्वाधिक छापे हे महाराष्ट्रात टाकण्यात आले आहेत. कर्नाटकात एका ठिकाणी तर उर्वरित छापे हे राज्यातील पुण्यात २ ठिकाणी, ठाणे ग्रामीण हद्दीत ३१ ठिकाणी, ठाणे शहर परिसरात ९ ठिकाणी, मीरा भाईंदर येथे १ असे ४१ ठिकाणी एनआयने एटिएसच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर