एनआयएची मोठी कारवाई! जालना, संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात, संशयितांमध्ये चामड्याचा मोठा व्यापारी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एनआयएची मोठी कारवाई! जालना, संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात, संशयितांमध्ये चामड्याचा मोठा व्यापारी

एनआयएची मोठी कारवाई! जालना, संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात, संशयितांमध्ये चामड्याचा मोठा व्यापारी

Oct 05, 2024 11:18 AM IST

NIA Raids In Maharashtra : राज्यात आज सकाळी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने जालना, संभाजीनगर आणि मालेगाव येथे कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे.

राज्यात एनआयची मोठी कारवाई! जालना, संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात, संशयितांमध्ये चामड्याचा मोठा व्यापारी
राज्यात एनआयची मोठी कारवाई! जालना, संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात, संशयितांमध्ये चामड्याचा मोठा व्यापारी

NIA Raids In Maharashtra : राष्ट्रीय तपास संस्था व दहशतवाद विरोधी पथकाने आज राज्यात मोठी कारवाई केली आहे. राज्यातील तीन जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली आहे. हे छापे जालना, मालेगाव, संभाजी नगर येथे घालण्यात आले असून या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. जालण्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयित हा मोठा चामड्याचा व्यापारी आहे.

दहशतवादी कृत्यात समावेश असल्याचा संशय असल्याने ही छापेमरी करण्यात आली आहे. राज्यसह देशभरात हे छापे घालण्यात आले आहे. आज सकाळी पहाटे ४ पासून ही संयुक्तपणे कारवाई सुरू करण्यात आली आहे. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी सध्या पंचनाने सुरू आहेत.

कारवाईचे कारण काय ?

एनआयए आणि एटीएसच्या पथकाला छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी देश विघातक कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छत्रपती संभाजी नगर, जालना व मालेगाव येथे देखील ही कारवाई करण्यात आली. या करवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांचा दहशतवादी कृत्यांमद्धे सहभाग असल्याचा संशय आहे. गांधीनगर, जालना येथून एकाला, छत्रपती संभाजी नगर शहरातील आझाद चौका जवळून एकला तर एन सिक्स परिसरातून तिसऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर मालेगाव येथील अब्दुल्ला नगरच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकून एकाला अटक करण्यात आली आहे. हे तिघेही जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याची माहिती असून त्यांची सकाळपासून चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू व काश्मीरमधील काही दहशतवादी संघटनांच्या संपर्कात हे तिघे होते. आंध्र प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांना शस्त्रे व स्फोटके पुरवल्याचा तपास सुरू असून या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

मेरठच्या सरूरपूरमध्ये देखील छापेमारी

एनआयए, एटीएस आणि आयबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा मेरठच्या सरूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिवई शहरात संयुक्त कारवाई केली. रात्री उशिरा सुमारे तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. सुरुवातीला तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यावर दोघांची सुटका करण्यात आली. एनआयए, एटीएस आणि गुप्तचर विभागाचे दिल्लीचे पथक पहाटे ३ च्या सुमारास सरूरपूरला पोहोचले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने खिवई गावातील सुमारे अनेक घरांवर छापा टाकण्यात आला. गावाबाहेरील मशिदीतून एका तरुणाला अटक करण्यात आली. मेहकर पुत्र जमशेद असे या तरुणाचे नाव आहे. मेहकर बराच काळ या मशिदीत राहून काम करत होता आणि मूळचा खिवईचा आहे. या पथकाने खिवई शहरातून एक अल्पवयीन आणि दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांचे मोबाइल जप्त करून त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत मेहकरने पाकिस्तानातील काही लोकांसोबत व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केल्याचे निष्पन्न झाले. या ग्रुपवर बरीच चर्चाही झाली. एनआयएने चौकशीनंतर दोन तरुणांची सुटका केली आहे, तर मेहकरला ताब्यात घेऊन पथक दिल्लीला रवाना झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर