मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vikram Gokhale Update: विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; पत्नी वृषालींनी सांगितलं सत्य

Vikram Gokhale Update: विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; पत्नी वृषालींनी सांगितलं सत्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 24, 2022 10:30 AM IST

Vikram Gokhale Health Update : जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता विक्रम गोखलेंच्या पत्नीनं स्पष्टीकरण दिलं आहे.

Vikram Gokhale Health Update
Vikram Gokhale Health Update (HT)

Vikram Gokhale Health Update : सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं अनेक लोक त्यांच्या स्वास्थासाठी प्रार्थना करत आहेत. परंतु काल संध्याकाळपासून विक्रम गोखले यांचं निधन झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं त्यावर विक्रम गोखलेंच्या पत्नी वृषाली गोखले यांनी माध्यमांसमोर येऊन घटनेमागचं नेमकं सत्य सांगितलं आहे.

माध्यमांशी बोलताना वृषाली गोखले म्हणाल्या की, विक्रम गोखले हे बुधवारी दुपारपासून कोमात गेलेले आहेत, ते तेव्हापासून स्पर्शालाही प्रतिसाद देत नाहीयेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून पुढील उपचार कसा करायचा, याबाबतचा निर्णय डॉक्टर्स घेणार आहे, असं म्हणत वृषाली गोखलेंनी विक्रम गोखलेंच्या निधनाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. विक्रम गोखलेंचे अनेक अवयव निकामी झाले असून त्यांना हृदय आणि किडनीशी संबंधित समस्या जाणवत आहेत. विक्रम गोखलेंची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची परदेशात राहणारी मुलगी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील मोठं नाव...

विक्रम गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी रंगभूमी, टीव्ही आणि मराठीसह हिंदी चित्रपटांतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांना घशाचा त्रास झाल्यामुळं त्यांनी नाटकात पुन्हा काम न करण्याचं ठरवलं होतं. गोदावरी चित्रपटातही त्यांनी अभिनय केलेला आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू असतानाच त्यांना ह्रदय आणि किडनीचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते शूटिंगसाठी परतले होते.

IPL_Entry_Point