मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Newlywed Woman Jumps In Front Of A Train With Her Boyfriend Death Of A Young Man At Chhatrapati Sambhaji Nagar

Sambhaji Nagar Suicide : संभाजीनगर हादरले! नवविवाहितेची प्रियकरासह रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

Chhatrapati Sambhaji Nagar Suicide
Chhatrapati Sambhaji Nagar Suicide (HT_PRINT)
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Mar 30, 2023 12:53 PM IST

Chhatrapati Sambhaji Nagar Suicide : छत्रपती संभाजी नगर येथे महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेने तिच्या प्रियकरासह रेल्वे पुढे येऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने आपल्या प्रियकरासोबत सासरच्या घरातून पळून जाऊन धावत्या रेल्वे पुढे उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी जखमी झाली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश मोहन तारू (वय २३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे मृत प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एकनाथनगर येथे घडली. उमेश आणि जखमी तरुणी दोघे मूळचे जळगाव येथील आहेत. ते मुक्ताईनगरचे येथील असून त्यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते.

मात्र त्यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता. तरुणीचा विवाह हा घरच्यांनी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील एका युवकासोबत लावून दिला. तिचा पती हा ठाण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. लग्नानंतर तरुणी सासरी गेली. पण, उमेश व तिचे प्रेमसंबंध हे सुरूच राहिले.

दरम्यान त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी ही सासर येथून पळून आली. दोघेही संभाजीनगरला भेटले. या ठिकाणी लॉजवर राहणार होते. मात्र, ही बाब कुटुंबीयांना समजताच ते त्यांच्या मागावर आले. यामुळे दोघांनी थेट एकनाथनगर परिसरातील रेल्वे रूळ गाठला. या वेळी तरुणी ही फोनवर बोलत असताना रेल्वे आली.

यावेळी उमेशने क्षणाचाही विचार न करता रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. यात उमेशचा मृत्यू झाला. दरम्यान, तरुणीने देखील रेल्वेसमोर उडी घेतली, पण ती सुदैवाने वाजली. तरुणीच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. जखमी झालेल्या तरुणीला उपचारानंतर घरी नेले आहे.

WhatsApp channel

विभाग