मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Panvel news : सेल्फीचा मोह बेतला जिवावर ! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू

Panvel news : सेल्फीचा मोह बेतला जिवावर ! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 30, 2023 09:25 AM IST

Newly married woman died at Prabalgad fort : पुण्यातील एका २४ वर्षीय नवविवाहितेला सेल्फीचा मोह जिवावर बेतल्याची एक धक्कादायक घटना पनवेलच्या प्रबळगड किल्यावर घडली. सेल्फी काढतांना पाय घसरून ही विवाहिता २०० फुट खोल दरीत कोसळली.

Newly married woman died at Prabalgad fort
Newly married woman died at Prabalgad fort

Newly married woman died at Prabalgad fort : पुण्यातील एका नव विवाहितेला सेल्फीचा मोह जिवावर बेतला. पुण्यातील हे दाम्पत्य पनवेल येथील प्रबळगडावर फिरायला गेले होते. दरम्यान, किल्यावरील एका टोकावर फोटो सेल्फी काढत असतांना या विवाहितेचा पाय घसरून ती सुमारे २०० फुट खोल दरीत कोसळली. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि २८) घडली. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकारणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी वर्णी

शुभांगी पटेल (वय २४) असे मृत महिलेचे नाव आहे. ती पुण्यातील दत्तवाडी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल (वय २७, सॉफ्टवेअर इंजिनिअर) यांचा विवाह ८ डिसेंबर रोजी झाला होता. या कालावधीत सर्व धार्मिक विधी पार पडल्यावर ते बुधवारी हनिमूनसाठी लोणावळ्याहून पनवेल येथील प्रबळ गड येथे गेले होते. गुरुवारी सकाळी हे जोडपे प्रबळगडाच्या माचिवर ट्रेकिंगसाठी गेले. दुपारी २.३० च्या सुमारास, गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर, शिवांगीने घाटाच्या काठावर उभे राहून सेल्फी काढण्यास सुरुवात केली. यावेळी तिचा पाय घसरून तिचा तोल गेला आणि ती दरीत पडली.

Kolhapur Murder: शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेला संपवलं! नंतर ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, कोल्हापुरात हत्याकांड उघड

दरम्यान, या घटनेची माहिती तिचा पती विनायक याने पनवेल तालुका पोलिसांना दिली. दरम्यान गडावरील काही ट्रेकर्स आणि निसर्ग मित्र या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या बचाव पथकातील सदस्यांनी दोरी आणि सुरक्षा हार्नेस वापरून दरीतून २०० फूट खाली पडलेल्या शुभांगीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिला तातडीने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शुभांगीचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे.

प्रबळगड किल्ला रायगड जिल्ह्यातील माथेरान आणि पनवेल दरम्यान महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुमारे २ हजार ३०० फूट उंचीवर आहे. हा किल्ला माथेरानच्या जवळ एका पठाराच्या शिखरावर बांधला गेला आहे. पूर्वी, किल्ल्याला मुरंजन म्हणून ओळखले जात असे. मराठा सैन्याने हा किल्ला तबल्यात घेऊन त्याचे नामकरण प्रबळगड केले. या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. गडावर जाणाऱ्या पायऱ्या डोंगराच्या खडकात बांधण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाय योजना नाही. त्यामुळे या ठिकाणी जातांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग