sangamner couple suicide : अहमदनगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलतं गावात झाडाला गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवलं आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण पुढे येऊ शकले नाही. पण, या प्रकारामुळे संपूर्ण गाव हदारलं आहे.
वैभव आमले (वय २२) आणि स्नेहा आमले (वय २०) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. रविवारी संध्याकाळी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी मुळा नदी जवळील मांगमळीत एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव व स्नेहा आमले यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच दोघेही संगमनेरमधील त्यांचे मूळ गाव असलेले साकोरे येथे परत आले होते. रविवारी संध्याकाळी त्यांनी मुळा नदीच्या मांगमळी येथे एका झाडाला गळफास घेतला.
दरम्यान, येथून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना त्यांचे झाडाला लटकलेले मृतदेह दिसले. ग्रामस्थांनी याची माहिती ही घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोलिसांनी आमले दाम्पत्याने आत्महत्या का केली, याचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे साकुर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उज्वला जितेंद्र गौड, शरयू परब, हेमंत दत्ता गायकवाड, राज निल, मुन्ना विठ्ठल गायकवाड, साक्षी गौड व काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक अनुराधा मुळीक यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात फर्ग्युसन रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. असे असतांना वाडेश्वर हाॅटेलजवळ बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली व नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या