Newborn baby was thrown on street : पुण्यात समाजमनाला हादरवणारी घटना समोर आली आहे. नवजात अर्भकाला रस्त्यावर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाळाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला पिशवी बंधण्यात आली होती. पुण्याच्या वडगाव बुद्रुकमध्ये ही घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना कळवली. बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पोलीस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. या घटेननंतर लोकांकडून नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं समाजमन देखील हादरुन घेलं आहे. बालकाला जन्म दिल्यानंतर लगेच रस्त्यावर सोडून देण्यात आले. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरमधील ही घटना आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बाळाचे तोंड प्लास्टिकच्या पिशवीने गुंडाळले होते.
सोमवारी रात्रीच्या वेळी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी याबाबत सिंहगड पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर, सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बालकाची तब्बेत स्थिर आहे. मात्र, नवजात बाळाला सोडून पसार होणाऱ्या आई-बापाविरोधात लोकांमध्ये संतापाची भावना आहे. याप्रकरणी, अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने बाळासोबत अशा प्रकारचे कृत्य घडले असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिसरातील रुग्णालयात नुकतेच जन्मलेल्या बालकांची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
संबंधित बातम्या