Viral News : ऑनलाइन ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये रक्त आढळल्यानं खळबळ; सगळेच हादरले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News : ऑनलाइन ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये रक्त आढळल्यानं खळबळ; सगळेच हादरले!

Viral News : ऑनलाइन ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये रक्त आढळल्यानं खळबळ; सगळेच हादरले!

Jul 29, 2024 03:53 PM IST

Viral News : अमेरिकेतील एका महिलेने आपल्या मुलीसाठी बर्गर किंगकडून बर्गर मागवला होता. पण बर्गरमध्ये रक्त असल्याचे पाहून ही महिला चांगलीच हादरली.

आइसक्रीममध्ये बोट आढळल्यानंतर आता ऑनलाइन मागवलेल्या बर्गरमध्ये आढळले रक्त; सर्वांना बसला धक्का
आइसक्रीममध्ये बोट आढळल्यानंतर आता ऑनलाइन मागवलेल्या बर्गरमध्ये आढळले रक्त; सर्वांना बसला धक्का

Viral News : नुकतेच मुंबईत ऑनलाइन मागवलेल्या आइसक्रीममध्ये मानवी बोटे आढळली होती. तसेच या पूर्वही अन्नामध्ये उंदीर, सरडे, बेडूक सापडण्याच्या बातम्या तुम्ही ऐकले असेलच. या घटना फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील घडतात. अशीच एक घटना अमेरिकेत पुढे आली आहे. एका महिलेने बर्गर किंग मधून मुलीसाठी बर्गर ऑनलाइन ऑर्डर केला. डिलिव्हरी झालेला हा बर्गर पाहून ही महिला हादरली. या बर्गरमध्ये रक्त दिसल्याने तिने थेट कंपनीकडे तक्रार केली. न्यूयॉर्क येथील टिफनी फ्लॉइड नामक महिलेसोबट हा प्रकार घडला आहे.

काय आहे नेमकी घटना ?

शुक्रवारी दुपारी फ्लॉइड ही तिच्या ४ वर्षांच्या मुलीसह फास्ट-फूड ड्राईव्ह-थ्रूला येथे गेली होती. फ्लॉइडने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घडलेल्या प्रकराबाबत पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, "माझ्या मुलीने मला सांगितले की आई मला केचप नको आहे. त्यामुळे आमच्या ऑर्डरमध्ये काहीतरी चुकीचे आहे असे वाटल्याने मी तिची बर्गरची बॅग पहिली. मला तिच्या हॅम्बर्गरवरील रॅपर दिसले. पण रॅपरवर रक्त होते. हॅम्बर्गरची संपूर्ण पिशवी तिने तपासली असता, आत रक्त असल्याचे आढळले. ऐवढेच नाही तर बर्गर देखील रक्ताचे भिजला होता. या नंतर तिने ताबडतोब तिच्या मुलीला अन्न फेकून देण्यास संगितले. या घटनेनंतर तिने थेट बर्गर किंगच्या मॅनेजरशी संपर्क साधला व झालेला सर्व प्रकार सांगितला.

यानंतर मॅनेजरने तिला सांगितले की जेवण बनवणाऱ्या एका आचाऱ्याचा हात कापला गेला, त्यामुळे हे सर्व घडले. मॅनेजरने माफी मागितली आणि महिलेचे पैसे परत करण्याची ऑफर दिली. महिलेने तिच्या मुलीची डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली आहे. डॉक्टरांनी संभाव्य समस्यांसाठी रक्त तपासण्यासाठी ३० दिवस प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला. बालरोगतज्ञांनी एक वर्ष मुलीच्या तब्येतीची काळजी घेण्याचे व नियमित तपासणीचा सल्ला दिला आहे.

कंपनीने प्रकरण दाबण्यासाठी दिली पैशांची ऑफर

जखमी कर्मचाऱ्याची ओळख लपवल्याप्रकरणी फ्लॉइडने बर्गरकिंगच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. जर कर्मचाऱ्याचीच चाचणी झाली असती तर तिच्या मुलीला इतक्या रक्ताच्या चाचण्या कराव्या लागल्या नसत्या, असे फ्लॉइडने म्हटलं आहे. फ्लॉइडने शेयर केलेल्या या पोस्टला १.८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शनिवारी, फ्लॉइडला बर्गर किंगच्या कॉर्पोरेट कार्यालयाकडून एक उत्तर मिळाले ज्यामध्ये कंपनीने तिच्या मुलीच्या उपचारासाठी संपूर्ण रक्कम देण्याची ऑफर दिली आहे. मात्र, केवळ पैशाच्या जोरावर कंपनी ही गंभीर घटना लपवू शकत नाही, असे फ्लॉइडने म्हटले आहे. बर्गर किंगने एका निवेदनाद्वारे या घटनेबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर