मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांचा उत्साह; पोलीस बंदोबस्तात वाढ, बीचवरील सुरक्षेत वाढ

New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांचा उत्साह; पोलीस बंदोबस्तात वाढ, बीचवरील सुरक्षेत वाढ

Dec 30, 2023 10:28 PM IST

Mumbai New Year Celebration : नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशन मूडला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे. मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे.

Mumbai New Year Celebration
Mumbai New Year Celebration

New Year Celebration Mumbai : नववर्षाच्या स्वगतासाठी व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरासह राज्यातील जवळपास सर्वच पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली आहेत. अनेकांनी आपल्या शहरातच ३१ डिसेंबरच्या पार्टीची तयारीही केली असून लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई पोलिसांनी नववर्षाच्या स्वागतानिमित्त पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

मुंबईतील विविध ठिकाणांसह गेट वे ऑफ इंडियासह इतर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सेलिब्रेशन मूडला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे. मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे.  नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी १८ बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या आहेत. १८ बोटी महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. 

पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ७७ जणांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या ४९ कारवाया करण्यात आलेल्या असून त्यात चाकू तलवारी शस्त्रे जप्त करण्यात आलेले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

सेलिब्रेशनसाठी लोकांनी समुद्रात जाऊ नये यासाठीही पोलीस लक्ष देणार आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस काळजी घेणार आहेत. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे ताज लँड, जुहू चौपाटी, अक्सा बीच, ट्रॉम्बे माहुल जेट्टी, भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आल्या आहेत.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर