दिल्ली : देशाला २८ मे रोजी नवे संसद भवन मिळणार आहे. या सोबत या दिवशी भारत सरकार ७५ रुपयांचं नव नाण बाजारात आणणार आहे. या बाबतची माहिती अर्थ मंत्रालयाने गुरुवारी दिली. विशेष म्हणजे हे ७५ रुपयांचं नाण भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या प्रवासाची साक्ष देणार आहे.
नवीन ७५ रुपयांच्या नाण्यावर अशोक स्तंभ असून त्यावर त्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला भारत' हे देवनागरीत लिहिले जाईल. यासोबतच इंग्रजीमध्ये 'इंडिया' देखील कोरण्यात आले आहे. या सोबतच नवीन संसदेचे संकुलही नाण्यावर दिसणारआहेत. त्यावर देवनागरीत 'संसद संकुल' आणि इंग्रजीत 'संसद संकुल' असे लिहिले जाणार आहे. हे नाणे ३५ ग्रॅमचे असून त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के झिंकचा समावेश राहणार आहे.
रविवारी होणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून मोठे राजकारण सुरू आहे. जवळपास १९ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर एनडीएच्या घटक पक्षांसह २० हून अधिक पक्ष उद्घाटनाला उपस्थित राहण्यास तयार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्घाटन समारंभासाठी निमंत्रित करण्यासाठी विरोधी पक्षांच्या अनेक पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे.
या सोहळ्यात बहुजन समाज पक्ष, शिरोमणी अकाली दल, जनता दल (धर्मनिरपेक्ष), लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल आणि तेलुगु देसम पार्टी हे सात गैर-एनडीए पक्ष या समारंभात सहभागी झाले आहेत. या पक्षांचे लोकसभेत ५० खासदार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे सरकारला हा निव्वळ सरकारी कार्यक्रम असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे खंडन करण्यात मदत होईल.
भाजप, शिवसेना, नॅशनल पीपल्स पार्टी, नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, जननायक जनता पार्टी, AIADMK, IMKMK, AJS, RPI, मिझो नॅशनल फ्रंट, तमिळ मानिला काँग्रेस, ITFT (त्रिपुरा), बोडो पीपल्स पार्टी, PMK याशिवाय. , MGP, अपना दल आणि AGP नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.