Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत अनेक जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आता आरोपींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करून आरोपी पळतांना दिसत आहे. त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ सोडून पळत असल्याचं सिसिटीव्ही व्हायरल झाला आहे. ६ आरोपी त्यांची स्कॉर्पिओ ही धाराशिवच्या वाशीमध्ये सोडून पळत असल्याचं सिसिटीव्हीत कैद झालं आहे. हे फुटेज पोलिसांसाठी महत्वाचं ठरणार आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करून देशमुख यांचा मृतदेह केज परिसरातील शिवारात फेकून दिला होता. यानंतर ६ आरोपींनी धाराशिव जिल्ह्याकडे पळून गेले होते. स्कॉर्पिओ सोडून पळून जात असल्याचा त्यांचा सिसिटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे.
देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह आणखी काही जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिसांचे आणि सीआयडीचे पथक आरोपींच्या मागावर आहे. या आरोपींच सिसिटीव्ही समोर आले आहे. अरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केल्यावर त्यांना धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी नेलं. या ठिकाणी त्यांचा मृतदेह फेकून आरोपी गाडी सोडून पळून जात असतांना सीसीटीव्हीत दिसत आहे. हे फुटेज धाराशिवमधील वाशी शहरातील पारा चौक येथील आहे. यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचे इतर साथीदार स्कॉर्पिओ सोडून पळतांना दिसत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरचे हे फुटेज असल्याचं देखील समोर आल आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकारणी अनेक आंदोलने करण्यात आली. या प्रकरणी वाल्मीक कराडच्या शोधात पोलिस होते. त्याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी देखील मोठे आंदोलन झाले. दरम्यान, वाल्मीक कराडने पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमधे जात आत्मसमर्पण केले. त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. मात्र, त्याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही.
संबंधित बातम्या