मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded news : भंडाऱ्यात दिलेल्या भगर आणि आमटीमुळे विषबाधा! नांदेडमध्ये २ हजार तर परभणीत १०० लोक आजारी

Nanded news : भंडाऱ्यात दिलेल्या भगर आणि आमटीमुळे विषबाधा! नांदेडमध्ये २ हजार तर परभणीत १०० लोक आजारी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 07, 2024 02:18 PM IST

Nanded parbhani food poisoned incident : नांदेड येथील लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे जत्रेत तर परभणी येथील माळसोन्ना गावामध्ये सुरू असलेल्या सप्ताहात उपवासाची भगर आणि आमटी खाल्ल्याने भाविकांना विषबाधा झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Nanded parbhani food poisoned incident
Nanded parbhani food poisoned incident

Nanded parbhani food poisoned incident : नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मंगळवारी एका जत्रेत भाविकांनी उपवासाची भगर आणि आमटी खाल्ल्याने विषबाधा झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाच्या मेंढ्या गावात आल्या होत्या. यावेळी गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांना एकादशीचा उपवास असल्याने भगरीचा प्रसाद आणि आमटी वाटण्यात आली. यातुन २ हजार भाविकांना विषबाधा झाली. त्यांना उलटया, चक्कर, मळमळ, जुलाब सुरू झाल्याने तातडीने येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. रुग्णालयात जागा नसल्याने अनेकांना जमिनीवर झोपवून उपचार करण्यात येत होते.

Sia Godika : बेंगळुरूची सिया ठरली ‘ऑस्कर ऑफ सायन्स’ची मानकरी; तब्बल ४ लाख डॉलर्सचे बक्षीस जिंकले

मिळालेल्या माहितीनुसार नांदेड येथील लोहा कोष्टवाडी येथे महाप्रसाद सुरू होता. उपास असलेल्यांनी भगर खाल्याने त्यांना थोड्या वेळाने उलट्या, जुलाब, मळमळ, चक्कर येथे सुरू झाले. या मुळे गोंधळ निर्माण झाला. बाधित भाविकांना तातडीने मिळेल त्या वाहनाने नांदेड येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तर काही भाविकांना खाजगी रुग्णालय भरती करण्यात आले. अचानक मोठ्या प्रमाणात आलेल्या रुग्णांमुळे दवाखान्यात देखील धावपळ उडाली. सध्या नांदेड आणि अहमदपूर येथे रुग्णावर उपचार सुरू आहेत. हा प्रकार कळताच प्रशासन देखील तयारीला लागले. पोलिस प्रशासाने पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास शहरातील खाजगी रुग्णालय उघडून रुग्णांवर उपचार सुरू केले.

Maharashtra Weather update : राज्यातील तापमानात वाढ! विदर्भ मराठवाड्यात आजही पावसाचा इशारा; असे असेल आजचे हवामान

परभणी जिल्ह्यात माळसोन्ना गावात १०० जणांना विषबाधा

दुसऱ्या घटनेत परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावात १०० जणांना भगर आणि आमटीतून विषबाधा झाली. माळसोन्ना गावात मंगळवारी हरीनाम सप्ताह सुरू होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाविकांना प्रसाद म्हणून भगरीचे वाटप करण्यात आले. भगर खाल्ल्यावर थोड्याच वेळात भाविकांना उलटी, जुलाब, चक्कर येऊ लागले. यामुळे गोंधळ उडाला.

ग्रामस्थांनी सर्व आजारी भाविकांना काही वाहनातून उपचारासाठी परभणीत नेले. रात्री ११ वाजता परभणीत काही दवाखान्यात कॅज्युलटीमध्ये बाधितांवर उपचार करण्यात आले. शंभरहून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती प्रशासाने दिली. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्षामध्ये अनेकांवर उपचार करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये महिला, मुलांचा समावेश आहे. यात कोणीही गंभीर नाही, मात्र, रुग्ण संख्या वाढतच आहे. दरम्यान, मंगळवारी असाच एक प्रकार पालम तालुक्यातील तीन गावांमध्ये घडला, ज्यात सात जणांना भगरीतूनच विषबाधा झाली होती.

WhatsApp channel