महायुतीत वाद निर्माण झाला आहे.भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले असून अजित पवार समर्थक आक्रमक झाले आहेत. पडळकर जिथं दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांचा उल्लेख'लबाड लांडग्याचं पिल्लू' असं म्हटलं होतं.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात अजित पवारांचा उल्लेख केला नाही. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारल्यानंतर पडळकर म्हणाले की, मी त्यांनी उपमुख्यमंत्री मानत नाही. 'अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे'.
गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक आक्रमक झाले असून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरु देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे.
धनगर आरक्षणाबाबत सरकारला लिहिलेल्या पत्रात पडळकरांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला आहे. त्यांनी म्हटलं की, आम्ही अजित पवारांना मानत नाही. अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहायचा विषय नाही. ते आता जरी आमच्यासोबत आले असले तरी त्यांची भूमिका वेगळी आहे"