मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संजय राऊतांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी नाराज; छगन भुजबळ म्हणाले, बोलण्या आधी चर्चा करायला हवी होती
NCP leader and food and civil supplies minister Chhagan Bhujbal HT File Photo
NCP leader and food and civil supplies minister Chhagan Bhujbal HT File Photo (HT_PRINT)
23 June 2022, 17:52 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 17:52 IST
  • राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थेर्यामुळे आता महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील घालमेल वाढली आहे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांनीही नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त करत शिवसेनेने कुठलाही निर्णय घेण्याआधी सांगायला हवे असे स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली.

Maharashtra political crisis राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोंडीमुळे सरकारची अस्थिरता वाढली आहे. एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसून या गटाने शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ म्हणाले सत्ता येते सत्ता जाते. परंतू शिवसेने ही भूमिका मांडण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांचे बंड महाविकास आघाडीच्या सरकारच्या मुळावर येऊन पोहचली आहे. या मुळे हे सरकार संकटात आले आहे. शिंदे यांच्या सोबत जवळपास ४५ आमदार आहेत. त्यात गुरुवारी संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य करत खळबळ उडवली. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, पण बंडखोरांनी २४ तासांच्या आत मुंबईत येण्याचे आवाहन त्यांनी केले. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षात नाराजी पसरली आहे. काँगे्रसचे पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. आता छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त केली.

शरद पवार यांच्या घरी सिल्वर ओक येथे बैठक पार पडल्यानंतर छगन भुजबळ प्रसार माध्यमांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले, सत्ता येत सत्ता जाते. अशी अनेक सत्तांतरे आम्ही पाहिली आहे. आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत. पण राऊतांनी जे वक्तव्य केले, त्या आधी शिवसेनेच्या नेत्यांनी आमच्या पक्षप्रमुखांशी बोलणे अपेक्षित होते. काल झालेल्या बैठकीत तरी या संदर्भात चर्चा झालेली नव्हती. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू. सध्या जे काही चालले आहे ते शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. सत्तेत काय पक्षातही अशी नाराही असतेच. ती कशी दूर करायची तो त्या पक्षाचा प्रश्न असतो. शिवसेनेला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा. आमचा आजही त्यांना पाठींबा आहे. हे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालले आहे. त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो शरद पवार यांच्याशी बोलून घ्यावा असेही भुजबळ म्हणाले.

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग