Jitendra awhad : अजित पवार मर्दाची औलाद असते तर…; जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नवा वाद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra awhad : अजित पवार मर्दाची औलाद असते तर…; जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नवा वाद

Jitendra awhad : अजित पवार मर्दाची औलाद असते तर…; जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नवा वाद

Nov 03, 2024 06:30 PM IST

Jitendra awhad : अजित पवारांमध्ये हिंमत असती तर त्यांनी आपला नवीन पक्ष स्थापन केला असता, मात्र त्यांनी आपल्या काकांचा पक्ष चोरला, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

अजित पवारांवरील जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने नवा वाद
अजित पवारांवरील जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने नवा वाद

Jitendra awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, जर अजित पवारांमध्ये हिंमत असती तर त्यांनी आपला नवीन पक्ष स्थापन केला असता, मात्र त्यांनी आपल्या काकांचा पक्ष चोरला. आव्हाड म्हणाले की, जनतेला सर्व सत्य माहिती आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, राष्ट्रवादी कोणाचा पक्ष होता?शरद पवारांचा पक्ष होता, मात्र अजित पवारांनी विश्वासघात करत त्यांना पक्षातून बाहेर केले आणि जाता-जाता शरद पवारांच्या हातातील घड्याळही हिसकावून घेतले. ही पाकिटमारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत असती, अजित पवार मर्दाचे अवलाद असते तर म्हणाले असते, मी दुसरे कोणते तरी चिन्ह घेतो आणि निवडणुकीत उतरतो. तसे झाले असते तर आम्ही त्यांना मर्द संबोधले असते. मात्र तुम्ही तुमच्या काकांचा पक्ष चोरून माझी पार्टी माझी पार्टी म्हणून फिरत आहात.

..तर चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार ७ दिवसात केंद्राचा पाठिंबा काढून घेतील -

जितेंद्र आव्हाडांनी भाजप व संघाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधताना म्हटले की, हे नथुराम गोडसेची औलाद आहेत. ते देशातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार केंद्र सरकारचा पाठिंबा सात दिवसांच्या आत मागे घेतील,असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज ठेवावी – राष्ट्रवादी

अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर म्हटले की, ज्यांच्यावर विनयभंग, ३०७ गुन्हा आहे. ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची केस आहे. त्यांना नैतिक अधिकार नाहीत. जितेंद्र आव्हाडांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणाले की, पराभव समोर दिसत असल्याने जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. कदाचित त्यांना लोकशाही मान्य नसल्याने असं वक्तव्य त्यांनी केलं असावं. पक्ष हा कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. तर लोकांनी निर्माण केलेलं संघठन आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. लोकांनी दादाचं नेतृत्व स्विकारलेलं आहे. आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी असं वक्तव्य केलं असावं. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे,असं सूरज चव्हाण म्हणालेत.

 

त्यांना मुंब्यात जाऊन औकात दाखवणार -

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आमदार मिटकरी म्हणाले की,खालच्या भाषेत बोलण्याची जितेंद्र आव्हाडाची संस्कृती आहे. विंचवाची नांगी तैसें दुर्जन सर्वांगी’,या अभंगाlतील ओळीप्रमाणे हा दुर्जन व्यक्ती आहे. त्याच्या नसानसांमध्ये विष भरलं आहे. अजित पवारांच्या वडिलांबद्दल आव्हाडांनी ज्या पद्धतीने टीका केली आहे, त्यांना त्याच शब्दात उत्तर दिले जाईल. शरद पवारांनाही खरंच वाटत असेल की जितेंद्र आव्हाडांनी अनंत पवारांचा अपमान केला आहे तर त्यांनी जितेंद्र आव्हाडला बारामतीला बोलावून घ्यावं आणि त्याचं थोबाड रंगवावं. अन्यथा मुंब्रा-कळव्यात जाऊन आम्ही आव्हाडला त्याची औकात दाखवणार.

Whats_app_banner