Sharad Pawar : पंतप्रधान मोदींचा ७० हजार कोटींचा घोटाळ्याच्या आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
Sharadpawar news : पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीवर तब्बल ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीवर केलेल्या गंभीर आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीरपणे देशातील सर्व विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. या पक्षाकडून एकाच गोष्टीची हमी मिळू शकते, ती म्हणजे घोटाळ्याची असा घणाघात मोदींनी केली.पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीवरही तब्बल ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीवर केलेल्या गंभीर आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आज पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात विरोधकांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. मोदींनीविरोधकांनी पाटण्यात घेतलेल्या बैठकीवर जोरदार टीका केली. या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांवरभ्रष्टाचाराचेआरोप केले.मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पाटण्यात एक फोटो सेशन झाले होते. फोटोत असलेले सगळे लोक. या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांचा इतिहास पाहिला, तर सर्व एकत्र केले तर किमान २० हजार कोटींचे घोटाळे होण्याची खात्री आहे. एकट्या काँग्रेसने कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले आहेत.
मोदी म्हणाले की,जर तुम्हाला गांधी परिवाराच्या मुला-मुलींचं कल्याण करायचंय तर काँग्रेसला मत द्या. शरद पवारांच्या मुलीचे कल्याण करायचं तर राष्ट्रवादीला मत द्या, लालुंच्या मुलांचे कल्याण करायचं असेल तर आरजेडीला मत द्या, करुणानिधीच्या मुलांच्या कल्याणासाठी डीएमकेला मत द्या. मात्र जर तुम्हाला तुमच्या मुलांचे, तुमच्या नातवांचे कल्याण करायचं असेल तर भाजपला मत द्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ७० कोटी रूपये घोटाळा असल्याचा आरोप असून त्यांचीही यादी मोठी असल्याचे मोदींनी म्हटले, यावर आताराष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो उल्लेख केला, ते शिखर बँक प्रकरण कोर्टात गेले आहे.पण यात काही तथ्य नाही.माझा त्या शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही, अशा संस्थेसोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे.
देशात मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात. देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात. मात्र ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची विधाने केली जातात. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असेही पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ज्या शिखर बँक घोटाळ्याचा आरोप केला त्या बँकेचा मी कधी सदस्यही नव्हतो. आजही नाही, त्या बँकेकडून मी कधीही कर्ज घेतलेले नाही. या बँके संदर्भात आरोप करणे किती बरोबर आहे, असंही शरद पवार म्हणाले.