NCP Sharad Pawar Party : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने सर्वात आधी आपली यादी जाहीर केली आहे. यानंतर राज्यात महावीकस आघाडीतील शिवसेना आणि कॉँग्रेसने यादी जाहीर केली आहे. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहिर होणार आहे. शरद पवार लोकसभेच्या १० जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी शरद पवार कुणाला उमेदवारी देणार या कडे लक्ष लागून आहे. दरम्यान, महावीकास आघाडीत तीन जागांवरून धुसफूस सुरू आहे. याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे यावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महावीकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा १० जागा लढवण्याची शक्यता आहे. बारामती, शिरुर, अहमदनगर आणि दिंडोरीसह भिवंडी या मतदारसंघाचा प्रामुख्याने समावेश आहे. काल नीलेश लंके यांनी अजित पावर यांना राम राम करत अहमदनगर येथून लोकसभा निवडणूक लढणवर असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची यादी आज जाहीर होईल. ही यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत ठाकरे गटाने त्यांच्या १७ उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली आहे.
शरद पवार पहिल्या यादीत कुणाला संधि देण्यार या कडे त्यांच्या विरोधकांचे लक्ष लागून आहे. दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उमेदवारांची नावे घोषित करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला महाविकास आघाडीतिल १० जागा मिळण्याची शक्यता आहे. आज बारामती, शिरूर, नगर दक्षिण, दिंडोरी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर वर्धा लोकसभेच्या उमेदवाराबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने माढा, बीड, रावेर, सातारा, वर्धा, लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरवलेला नाही.