मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : आज कुर्डूवाडीला येऊ नका; शरद पवारांना आलेल्या धमकीच्या फोनमुळं खळबळ

Sharad Pawar : आज कुर्डूवाडीला येऊ नका; शरद पवारांना आलेल्या धमकीच्या फोनमुळं खळबळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 19, 2022 07:44 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (SharadPawar) यांना अज्ञाताकडून धमकीचा फोन आला होता. आज कुर्डुवाडी दौऱ्यासाठी येऊ नये,असा इशारा शरद पवारांना फोन करून देण्यात आला होता. शरद पवारांना धमकीचा फोन मुंबई पोलीस कंट्रोल रूमला ( Mumbai police control room) आला होता.

शरद पवार
शरद पवार

मुंबई–राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (SharadPawar) आज कुर्डूवाडी दौऱ्यावर होते. मात्र दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अज्ञाताकडून धमकीचा फोन आला होता. आज कुर्डुवाडी दौऱ्यासाठी येऊ नये,असा इशारा शरद पवारांना फोन करून देण्यात आला होता. शरद पवारांना धमकीचा फोन मुंबई पोलीस कंट्रोल रूमला ( Mumbai police control room) आला होता. पण या धमकीच्या फोननंतरसुद्धा शरद पवारांनी नियोजित दौरा पूर्ण केला आहे. 

आज सकाळी कुर्डुवाडीमध्ये दौऱ्यासाठी येऊ नये,अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून पवारांना देण्यात आली होती. या फोननंतरही शरद पवार डगमगले नाहीत आणि त्यांनी कुर्डुवाडीचा दौरा पूर्ण केला. फोन करून धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, आणि त्याने का धमकी दिली, याची माहिती समोर आलेली नाही.

मुंबई पोलिसांनी धमकीच्या या फोनची गंभीर दखल घेतली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबर रेकॉर्डवर आला आहे. या नंबरचा शोध पोलीस घेत आहेत. धमकीचा हा फोन सोलापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

बारामतीत पवारांचाच वरचष्मा -

पवारांच्याबालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत,मात्र दरम्यान झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा आपलाच असल्याचे राष्ट्रवादीने दाखवून दिलं आहे. निकाल लागलेल्या६१ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. भाजपने केवळ८जागांवर यश मिळवलं.

शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठीभाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघातकेंद्रीय मंत्र्यांनादौऱ्यासाठी पाठवलं आहे.मिशन महाराष्ट्र आणण्यात आला आहे. मात्र आज जाहीर झालेल्याग्रामपंचायत निकालात या दोन्ही मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या