मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : ..तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत! निवडणूक आयोगाच्या निकालावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Maharashtra Politics : ..तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत! निवडणूक आयोगाच्या निकालावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Feb 06, 2024 09:23 PM IST

Rohit Pawar On Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह अजित पवारांना बहाल केले आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

rohit pawar on election commission
rohit pawar on election commission

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कोणाची यावर महत्वपूर्ण निकाल दिला आहे. आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का देत राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह घड्याळावर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबतीत एकनाथ शिंदे गटाला जो न्याय दिला तोच न्याय अजित पवार गटाला देत त्यांच्या बाजुने निकाल दिला आहे. केंद्रीय आयोगाचा निकाल हा शरद पवार गटाला धक्का मानला जात आहे. या सर्व राजकीय घडामोडीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाचा बाप आमच्या बाजुने असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळणार आहे. यामुळे शरद पवार गटाला नवं नाव व नवे पक्षचिन्ह ठरवावे लागणार आहे. यासाठी बुधवार सायंकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबत निकाल दिल्यानंतर रोहित पवारांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची पात्रता कळते'.

WhatsApp channel