मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांनीच केला खुलासा, म्हणाले…

Sharad Pawar : अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांनीच केला खुलासा, म्हणाले…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 03, 2022 02:52 PM IST

Sharad Pawar On Ashok Chavhan Statement : युती सरकारच्या काळातच शिवनसेनेकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला असल्याकहा गौप्यस्फोट कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यात एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश होता असे ते म्हणाले, होते. त्यांच्या या वक्तव्यावर थेट राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

NCP Chief Sharad Pawar
NCP Chief Sharad Pawar (Vijay Bate)

पुणे : युती सरकारच्या काळातच शिवनसेनेकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला असल्याकहा गौप्यस्फोट कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यात एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश होता असे देखील चव्हाण म्हणाले होते. त्यांच्या या व्यक्तव्या नंतर खळबळ उडाली होती. राज्याच्या राजकणारनात देखील अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, असे काही झाले नसल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी स्पष्ट केल होते. आता त्या नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या त्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, शिवसेनेकदुन आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव कुणीही दिलेला नाही. राष्ट्रवादीला जर असा प्रस्ताव कुणी दिला तर पक्षप्रमुख म्हणून मला याची किमान माहिती तरी असते. राष्ट्रवादीचे सगळे निर्णय घेण्याचा आमच्या अन्य लोकांना अधिकार आहे. परंतु तरीही ते माझ्या कानावर महत्वाच्या गोष्टी घालत असतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीही ऐकलं नाही असे देखील पवार म्हणाले.

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासंदर्भात पवार म्हणाले, शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळव्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत केली जात आहे, असा भाजपाने आरोप केला आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि दुसरा कार्यक्रम शिंदेंच्या सेनेचा आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाने त्यांच्या कार्यक्रमात ढवळाढवळ करणे योग्य नाही. आम्ही ती करतही नाही असे पवार म्हणाले. दुर्दैवाने एका पक्षाचे दोन भाग झाले आणि त्यामधून एक स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचे सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारले गेले. संघर्ष होतो पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. ही मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते काही राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. एकनाथ शिंदे हे राज्याचे जे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील पण महाराष्ट्राच्या १४ कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे. हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असे देखील शरद पवार म्हणाले.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या