मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Ncp Protested Demand Action Against Pradeep Kurulkar Who Provided Sensitive Info About Indias Defense To Pakistan

Pradeep Kurulkar : पाकिस्तानला माहिती पुरवणं हीच आरएसएसची शिकवण आहे का?, राष्ट्रवादीचं कुरूलकर विरोधात आंदोलन

NCP Protest Against Pradeep Kurulkar
NCP Protest Against Pradeep Kurulkar (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
May 09, 2023 02:02 PM IST

Pradeep Kurulkar DRDO : डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरूलकर याने भारताच्या संरक्षण विषयक संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याची घटना समोर आली आहे.

NCP Protest Against Pradeep Kurulkar : भारताविषयीची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र दहशतवादी पथकाने पुण्यातील डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याला अटक केली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर प्रदीप कुरूलकर याने डीआरडीओ तसेच संरक्षण विषयक अतिशय संवेदनशील माहिती शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पाठवल्याचं एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादीने पुण्यातील बालगंधर्व चौकात प्रदीप कुरूलकर याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जोरदारा आंदोलन केलं आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पाकिस्तानला माहिती पुरण्याचीच शिकवण देण्यात येते का?, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

झारा दास गुप्ता या बनावट पाकिस्तानी अकाऊंटवरून एका तरुणीचा डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरूलकर याचा संवाद झाला होता. त्यानंतर कुरूलकर हा हनीट्रॅपमध्ये अडकला. पाकिस्तानने ब्लॅकमेल केल्यानंतर प्रदीप कुरूलकर याने भारताच्या डिफेन्स विभागातील अतिशय संवेदनशील आणि गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवली आहे. याच गोष्टीचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निषेध करत प्रदीप कुरूलकर याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रदीप कुरूलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होता, त्यावेळी संघाने पाकिस्तानला मदत करण्याचीच शिकवण दिली का?, असा सवालही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलताना उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात बाल गंधर्व चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रदीप कुरूलकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान तपास यंत्रणांनी प्रदीप कुरूलकर याला अटक केली असून त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. याशिवाय एटीएससह देशातील इतर गुप्तचर यंत्रणा या देखील प्रदीप कुरूलकर याच्या हालचालींवर आणि तपासावर लक्ष ठेवून आहेत.

WhatsApp channel