मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prakash Ambedkar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेच महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या डाव रचला; प्रकाश आंबेडकर यांचा

Prakash Ambedkar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेच महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या डाव रचला; प्रकाश आंबेडकर यांचा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 21, 2022 08:03 AM IST

Prakash Ambedkar on Shiv Sena, Congress : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रावादी कॉँग्रेसवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनीच महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा डाव रचल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता. त्यांच्यामुळेच हे सरकार कोसळले, असा गंभीर आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार होतो. मात्र, आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून प्रतिसाद नाही असेही ते म्हणाले.

सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेनेवर अनेक गंभीर आरोप केले.

आंबेकर म्हणाले, आम्ही आघाडी करण्यासाठी कॉँग्रेस आणि शिवसेने सोबत तयार होतो. तसा प्रस्थाव देखील त्यांना आम्ही दिला होता. मात्र, त्यांनी आम्हाला काहीही प्रतिसाद दिला नाही. आज देशात अराजक मजले आहे. देश हुकुमशाहीकडे चालला आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली असली तर ती वाढदिवस असताना सोडली नव्हती. मात्र, मोदी यांनी चित्ते सोडली. यातून दहशत पसरवण्याचा भाजपचा डाव आहे असे देखील आंबेडकर म्हणाले. राहुल गांधीवर टीका करत आंबेकर म्हणाले, भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी मात्र, भलतीकडेच चालले आहे. वेदांता प्रोजेक्टबाबत, गुजरात आणि त्या कँपनीमध्ये करार झाला आहे, आता कोणत्याही परिस्थितीत प्रोजेक्ट परत येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी फसवणूक बंद करावी असेही ते म्हणाले.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या