पोर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजनक माहिती-ncp mla sunil tingre connection with porsche car accident reveal pune police commissioner amitesh kumar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पोर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजनक माहिती

पोर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजनक माहिती

Sep 06, 2024 05:59 PM IST

पोर्शे कार अपघातात आरोपीला मदत केल्याच्या आरोपात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी केली. या अपघात प्रकरणात आमदार टिंगरे यांचा थेट संबंध असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.

पोर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध?  
पोर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध?  

पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव अलिशान पोर्शे कारने दिलेल्या धडकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी अग्रवाल यांना पोलिसांसोबत अन्य अनेक लोकांनी मदत केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर रक्ताचे नुमने बदलण्यात तसेच अन्य काही गोष्टीमध्ये मदत केल्याच्या आरोपात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी केली. या अपघात प्रकरणात आमदार टिंगरे यांचा थेट संबंध असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.

आज पत्रकारांशी बोलताना अमितेश कुमार यांनी सांगितले की, पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांच्या कार्यपद्धती,तसेच तपासाबाबत काहींनी शंका उपस्थित केली. समाज माध्यमात पोलिसांवर टीका करण्यात आली. मात्र,पोलिसांनी तपासात हलगर्जी केली नाही. पुणे पोलिसांनीकल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला आहे.याअपघात प्रकरणात संबंधित दोषींवर कारवाई केली आहे. यातून कोणालाही सोडले नाही. अपघात झाल्यानंतर आमदार सुनील टिंगरे येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. टिंगरे यांनी पोलिसांवर दबाब आणला का नाही, हे आताच सांगणे योग्य होणार नाही. मात्र, टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे तीन महिन्यानंतरही आरोपींनी जामीन नाही -

पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी सर्व शक्यता गृहित धरून सखोल तपास केला. असूनही तपास सुरू आहे. प्रकरणाच्या तांत्रिक मुद्यांवर बारकाईने लक्ष ठेवले. परिस्थितीजन्य,तसेच तांत्रिक पुरावे गोळा केले. साडेतीन महिन्यानंतरही अपघात प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर झाला नाही, यावरून सिद्ध झाले आहे की, पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यात पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. अल्पवयीन आरोपी कार चालवत होता. रात्रभर पबमध्ये बसून दारु प्यायल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बेदरकारपणे कार चालवून त्याने दोघांना उडवले होते. या प्रकरणात आरोपीला निबंध लिहून देण्याची शिक्षा सुनावल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. पोलिसांनी आरोपीचे मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक करण्यात आली होती. विशाल अग्रवाल मुलाला सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. रक्ताचे नमुने बदलले तसेच कार त्यांचा ड्रायव्हर चालवत असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांनी याचा सखोल तपास करत आरोपींना गजाआड केले. पोलीस तपासात याप्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा देखील याता हात असल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे.

पुणे पोलिसांनी या प्रकरणातील सर्व दोषींना अटक केली. अल्पवयीन मुलगा, त्याचे आई-वडील, आजोबा यांना देखील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक केली आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या तीन कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Whats_app_banner
विभाग