मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा राडा! दुचाकीला धक्का लागल्याने भररस्त्यात पिस्तूल काढले

Pune Crime : रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा राडा! दुचाकीला धक्का लागल्याने भररस्त्यात पिस्तूल काढले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 08, 2024 11:55 AM IST

Pune Crime : आमदार रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा राडा! दुचाकीला धक्का लागल्याने भररस्त्यात पिस्तूल काढून धमकावले

Pune Crime
Pune Crime

Pune Crime : दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या वादवादीतून आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने बुधवारी भर रस्त्यात तरुणांना धमकावले. दुचाकीवरून जाणाऱ्या तरूणांशी किरकोळ कारणावरून वादावादी करत त्याच्या जवळील पिस्तूल त्यांच्यावर रोखत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी रात्री घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

केएफसी अयोध्येत आऊटलेट उघडणार! पण त्या आधी मान्य करावी लागणार योगी सरकारीची 'ही' अट

प्रताप धर्मा टक्के (वय ३९, रा.कात्रज) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौरभ तानाजी काळे (वय २७, रा. हडपसर) याने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्रालयाच्या आवारात फोटोसेशन, रिल्स बनवणं महागात पडणार, थेट कारवाई होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षक प्रताप धर्मा टक्के याने किरकोळ कारणावरून एका तरुणाला पिस्तूल काढून धमकावले. टक्के याच्या कडे पिस्तुलाचा परवाना आहे. टक्के हा बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास हडपसर येथील माळवाडी येथून निघाला होता. यावेळी फिर्यादी तरुण हा समोरून येत होता. यावेळी त्याच्या दुचाकीचा धक्का प्रताप टक्के याच्या गाडीला लागला. यामुळे टक्के याने तरुणाची वाद घालण्यास सुरवात केली. वाद सुरू असतांना त्याने त्याच्या जवळील परवाना असलेले पिस्तूल या तरुणावर रोखत त्याला शिवीगाळ करत जीव मारण्याची धमकी दिली. यानंतर तो फरार झाला. यानंतर फिर्यादी सौरभ व त्याच्या मित्रांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी प्रताप टक्के याच्या विरोधात तक्रार दिली.

पोलिसांनी याची दखल घेत जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच शस्त्राचा धाक दाखविल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पिस्तूल काढून राडा घातल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या जवळील शस्त्र परवाना, परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि सात काडतुसे जप्त केली आहे. आरोपी प्रताप हा काही वर्षांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्याकडे खासगी अंगरक्षक म्हणून कमाल होता. मात्र, त्याने गेल्या वर्षी हे काम सोडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

WhatsApp channel