Rohit Pawar: राधेशाम मोपलवारांच्या कोणत्या नातेवाईकांकडे किती संपत्ती? रोहित पवारांनी वाचून दाखवली यादी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar: राधेशाम मोपलवारांच्या कोणत्या नातेवाईकांकडे किती संपत्ती? रोहित पवारांनी वाचून दाखवली यादी

Rohit Pawar: राधेशाम मोपलवारांच्या कोणत्या नातेवाईकांकडे किती संपत्ती? रोहित पवारांनी वाचून दाखवली यादी

Jul 09, 2024 01:54 PM IST

Rohit Pawar Allegation: आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

 समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा रोहित पवारांचा आरोप
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा रोहित पवारांचा आरोप (Sandeep Mahankal)

Rohit Pawar On Radheshyam Mopalwar: समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाला असून राधेशाम मोपालवर यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. महामार्गाच्या कामातून अधिकाऱ्यांची समृद्धी झाली की सर्वसामन्यांची? असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी राधेशाम मोपलवारांच्या कोणत्या नातेवाईकांकडे किती संपत्ती आहे? याची यादी वाचून दाखवली आहे.

रोहित पवार म्हणाले की, समृद्धी महामार्गात ३००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. "२०१८ मध्ये समृद्धी महामार्गाचे टेंडर काढण्यात आले. त्यावेळी या टेंडरची किंमत ४९ हजार कोटी इतकी होती. चार महिन्यानंतर नवीन टेंडर काढण्यात आले, ज्याची किंमत ५५ हजार कोटी इतकी करण्यात आली. अवघ्या चार महिन्यात टेंडरची किंमत तब्बल ६ हजार ८८ कोटी रुपयांनी वाढली", असे रोहित पवार म्हणाले आहेत.

राधेशाम मोपलवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, "राधेशाम मोपालवार यांच्या स्वत:च्या नावावर १ हजार ५०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या दुसऱ्या बायकोच्याा नावावर १५० कोटी आणि तिसऱ्या बायकोच्या नावावर २०० कोटींची मालमत्ता आहे. एवढेच नव्हेतर, मोपलवार यांच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलींच्या नावावर जवळपास ८५० कोटी इतकी मालमत्ता आहे. त्यांचे भाऊ सदानंद मोपलवार यांच्या नावावरही ५० कोटींची मालमत्ता आहे. अशा पद्धतीने या आकड्याची बेरीज केली ती ३००० कोटींच्या आसपास जातो."

माझी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नुकतीच महिलांसाठी बहिण माझी लाडकी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, या योजनेवरून रोहित पवार यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला."एकाबाजूने महिलांना १५०० रुपये देण्याचे सोंग करायचे आणि दुसरीकडे अधिकाऱ्याला ३००० कोटी लाटायला द्यायचे", असाही टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर