Sharad Pawar : कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा; शरद पवारांचे नाशकात आंदोलन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा; शरद पवारांचे नाशकात आंदोलन

Sharad Pawar : कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा; शरद पवारांचे नाशकात आंदोलन

Updated Dec 11, 2023 04:59 PM IST

Sharad Pawar in Nashik Protest: नाशिकच्या चांदवड येथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केली आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar

NCP Protest on Onion Export Ban: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातमूल्यामध्ये वाढ केल्यानंतर आता कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. कांदा निर्यातबंदीचा निर्णयाविरोधात शरद पवारांनी नाशिकच्या चांदवड येथे आंदोलन सुरु केले. “कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा असून या आंदोलनानंतर केंद्र सरकारला कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार”, असाही शरद पवार यांनी इशारा दिला.

“देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने कांदा निर्यातबंदी उठवलीच पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली. शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला सुरुवात झाली की, केंद्र सरकार लगेच निर्णय घेते. आधी कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवले. आता त्यांनी थेट निर्यातीवर बंदीच घातली. हा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा आहे. यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली पाहिजे”, असे शरद पवार म्हणाले.

“यूपीए सरकारच्या काळात मी कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले. त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी आंदोलने केली. अनेक भाजप खासदारांनी कांद्याच्या माळ्या गळ्यात घालून निदर्शने केली. त्यावेळी मी त्यांना ठणकावून सांगितलं परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, पण निर्यातबंदी करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली”, अशीही शरद पवारांनी केंद्र सरकारला आठवण करुन दिली.

या आंदोलनात कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव आणि चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधव, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्यामुळे अनेक भागातील शेती उद्धवस्त झाली. कांद्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, केंद्र सरकार बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे, अशीही खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर