मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rupali Patil Thombare : 'फडणवीसांचे वडील आणि काकू पण...', रुपाली पाटलांनी थेट यादीच केली शेअर
Rupali Patil Thombare On Devendra Fadnavis
Rupali Patil Thombare On Devendra Fadnavis (HT)

Rupali Patil Thombare : 'फडणवीसांचे वडील आणि काकू पण...', रुपाली पाटलांनी थेट यादीच केली शेअर

16 August 2022, 19:04 ISTAtik Sikandar Shaikh

Rupali Patil Thombare On Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यानिमित्त केलेल्या संबोधनात राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली होती.

Rupali Patil Thombare On Devendra Fadnavis : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना घराणेशाहीवर सडकून टीका केली होती. याशिवाय घराणेशाही संपवण्यासाठी देशवासियांनी मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं, त्यानंतर आता याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी विचारला आहे.

<p><strong>Rupali Patil Thombare On Devendra Fadnavis</strong></p>
Rupali Patil Thombare On Devendra Fadnavis (HT)

कारण देवेंद्र फडणवीसांचे वडिल गंगाधरराव फडणवीस हे आमदार होते, त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस या माजी मंत्री होत्या, त्यामुळं आता फडणवीस हे राजकीय पार्श्वभूमितून आलेले असलल्यानं त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला मान देत राजीनामा देतील का?, असा खोचक सवाल फडणवीसांना केला आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटवरवर फडणवीस घराण्याची यादीच शेयर केली आहे.

<p><strong>Rupali Patil Thombare On Devendra Fadnavis</strong></p>
Rupali Patil Thombare On Devendra Fadnavis (HT)

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणात असलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता रुपाली पाटलांनी उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.