Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सत्ताधारी मंत्र्यांचे विदेशी दौरे आणि राज्यातील नोकर परतीच्या परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडी कौस्तुभ धवसेच्या विदेशी दौऱ्यावर १ कोटी ८८ लाखांचा खर्च झाल्याचा आरोप रोहित फवार यांनी केला. यावर आता कौस्तुभ धवसे यांनी स्पष्टीकरण दिले.
रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित पवारांनी तलाठी भरती घोटाळा आणि राज्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरील खर्चावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील उद्योगधंद्यांकरीता परकीय गुंतवणूक आणण्यासाठी राज्यातून कोणत्या नेत्यांनी परदेश दौरे केले. त्यासाठी किती खर्च आला? याबाबत एमआयडीसीकडे २३ नोव्हेंबर २०२३ ला माहिती मागिवली होती, ज्यात जवळपास ४२ ते ४५ कोटी रुपये खर्च आल्याची माहिती आहे.
फडणवीसांचे ओएसडी कौस्तुभ धवसे यांच्या परदेश दौऱ्यावर १ कोटी ८८ लाख खर्च आल्याची माहिती मिळाली. कौस्तुभ धवसे कशासाठी या दौऱ्याला गेले होते, असा प्रश्न रोहित पवार यांनी अजित पवार यांना विचारला. याशिवाय, ५ लोकांसाठी ६० लाख रुपये खर्च कसा झाला, याची कॅगने चौकशी करावी. तसेच बिझनेस क्लास कोणाला आहे. कौस्तुभ धवसे हे कसे प्रवास करतात. ३०- ३० हजारांच्या रुपये तिकिटावर ते प्रवास करतात. मात्र, अधिकारी देखील असे करत नाही. एमआयडीसीच्या पैशांवर परदेश दौरा झाला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.