मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar: तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर, १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं

Rohit Pawar: तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर, १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2024 11:24 PM IST

Rohit Pawar left from ED office: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तब्बल ११ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहेत.

Rohit Pawar
Rohit Pawar

Rohit Pawar ED Interrogation: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर आज (२४ जानेवारी २०२४) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास रोहित पवार ईडीच्या मुंबईतील बॅलोर्ड पीयर येथील कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल ११ तासाच्या चौकशीनंतर रोहित पवार कार्यालयातून बाहेर पडले आहेत. आज ११ तास चौकशी झाल्यानंतरही १ फेब्रुवीरीला पुन्हा बोलवण्यात आल्याची रोहित पवार यांनी माध्यमांना दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांच्या बारामती येथील अॅग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती.ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. रोहित पवार बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीर करत जल्लोष केला.

ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, " न बोलावता तुम्ही या ठिकाणी आलात, याबद्दल तुमेच आभार मानतो. कोणालाही गर्दी करण्यास सांगितले नाही. पंरतु, प्रेमापोटी तुम्ही सगळे सकाळपासून येथे थांबले आहेत. मी आतमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत होतो, त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, तेव्हा पवार साहेब खंबीरपणे मागे उभे राहतात. याच्यावरुन एक गोष्ट लक्षात घ्या की, पवार साहेब संधी देतातही आणि अडचणीत आलेल्यांना बाप माणूस म्हणून मागे उभे राहतात. हा स्वाभिमान आणि विचारांचा वारसा आहे. आपल्या सगळ्यांची संघर्षाची तयारी असली पाहिजे", असे रोहित पवार म्हणाले आहेत.

पुढे रोहित पवार म्हणाले की, “आज ११ तास चौकशी झाल्यानंतर मला पुन्हा १ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीत त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली आहेत. १ तारखेला अतिरिक्त माहिती मागवलेली आहे, तीही मी देणार आहे. मी व्यवसायातून राजकारणात गेलो. काही लोक राजकारणातून व्यवसायात येतात. आम्ही कधीच त्यांना प्रश्न केला नाही. मग त्यांना का आम्हाला प्रश्न करायचा?” असाही सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

WhatsApp channel